धक्कादायक ! ठाण्यातील खिडकाळी तलावात अचानक मृत माशांचा खच

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – डोंबिवलीच्या खिडकाळी तलावातील अचानकपणे शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. या तलावात सर्वत्र मेलेल्या माशांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. माशांचा मृत्यू का आणि कशाने झाला, हे कोणालाही समजत नाहीय. तसंच काल सकाळपासून माशांचा मृत्यू होण्यास सुरुवात झाली आहे. अचानक झालेल्या या शेकडो माशांच्या मृत्यूमुळे संबंधित परिसरात खळबळ माजली आहे.

डोंबिवलीचा खिडकाळी तलाव हा ठाणे महापालिकेच्या हद्दीत यतो. त्यामुळे तलावात झालेल्या या घटनेची दखल त्यांनी घेणे आवश्यक आहे. मात्र तेथील स्थानिक नगरसेवक बाबजी पाटील यांनी माहापालिकेत तक्रार देऊनही पालिका प्रशासन याप्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे परिसारातील नागरिकांमध्येही प्रशासनाबाबत रोष दिसत आहे.

दरम्यान, खिडकाळी तलावात काल सकाळपासून माशांचे मृत्यू होण्यास सुरुवात झाली होती. एका दिवसात तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. माशांचे मृत्यू का झाले, याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तसंच तलावातील मेलेल्या माशांचा खच वर तरंगत आहे. या प्रकारावर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि या मागील रहस्य उलगडावे यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

 

Loading...
You might also like