फरार होऊन मेहुल चोक्सीने केली मोठी चूक, आता अँटीगुआमध्ये परतू शकणार नाही, PM म्हणाले – ‘डोमिनिकाहून थेट भारतात पाठवले जाईल’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा आरोपी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी डोमिनिकामध्ये पकडला गेला आहे. अँटीगुआ मीडियाने बुधवारी हा दावा केला. सूत्रांनुसार चोक्सी डोमिनिकाहून क्यूबाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, त्याच वेळी त्याला पकडण्यात आले. ही अटकेची कारवाई स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी झाली. यावर अँटीगुआचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउनी यांनी इशारा दिला आहे की, त्यास थेट भारतात पाठवले जाऊ शकते. आम्ही डोमिनिकाला सांगितले की, बेकायदेशीर प्रकारे डोमिनिकामध्ये प्रवेश केल्याने मेहुल चोक्सीवर कारवाई करावी आणि त्यास थेट भारताकडे सोपवावे.

एएनआयच्या वृत्तानुसार, अँटीगुआ आणि बरबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांनी म्हटले की, डोमिनिकामध्ये पकडलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सील भारताकडे सोपवले जाईल आणि अधिकारी डोमिनिकामध्ये त्या लोकांच्या संपर्कात आहेत. एक दिवस अगोदर वृत्त आले होते की, चोक्सी अँटीगुआ-बारबुडातून बेपत्ता झाला आहे. तेथील मीडियानुसार, पोलीस चोक्सीचा शोध घेत होते. चोक्सी शेवटचा रविवारी सायंकाळी 5.15 वाजता दिसला होता. त्यानंतर त्याच्या विरोधात इंटरपोलने यलो नोटिस जारी केली होती. या अंतर्गत शेजारी देश डोमिनिकाने त्यास पकडले.

एएनआयला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये पंतप्रधान ब्राऊनी यांनी म्हटले की, डोमिनिका मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी तयार झाले आहे आणि अँटीगुआ त्यास पुन्हा स्वीकारणार नाही. अँटीगुआचे पंतप्रधान ब्राऊनी यांनी म्हटले की, त्यांनी डोमिनिकामध्ये पीएम स्केरिट आणि कायदा अंमलबजावणीकडून मेहुल चोक्सीला अँटीगुआला न परतण्याची विनंती केली आहे, जिथे त्यास नागरिक म्हणून कायदेशीर आणि संविधानिक सुरक्षा प्राप्त आहे.

त्यांनी म्हटले की, आम्ही डोमिनिकन सरकारला विनंती केली आहे की, त्यास ताब्यात घ्यावे आणि भारताच्या ताब्यात देण्याची व्यवस्था केली जावी.