DON 3 Motion Poster Out | फरहान अख्तरने रिलीज केले ‘डॉन 3’ चित्रपटाचे मोशन पोस्टर आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – DON 3 Motion Poster Out | बॉलीवुडमध्ये सध्या अनेक चित्रपटांचे सिक्विल येत आहे. यामध्ये अनेक दिवसांपासून प्रेक्षक ब्लॉकबस्टर डॉन या फ्रेंचायझीच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. अभिनेता व चित्रपट निर्माता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याचे ‘डॉन’ व ‘डॉन 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजले. या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉलीवुडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने प्रमुख भूमिका साकारली आहे. आता फरहान अख्तरने ‘डॉन 3’ च्या चित्रपटाचा (DON 3 Motion Poster Out) संकेत देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

फरहान अख्तर यांच्या डॉन चित्रपटाच्या (DON Movie Franchise) फ्रेंचायझीमधील तिसरा पार्ट लवकरच घेऊन येणार आहे. त्याने आता सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. बहुचर्चित या ‘डॉन 3’ चित्रपटाचे पूर्ण नाव ‘डॉन 3 – द चेस एंड’ (Don 3: The Chase Ends) असे असून चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. मात्र यामध्ये शाहरुख खानच्या ऐवजी दुसरा कलाकार काम करणार आहे. याची प्रेक्षकांना देखील आतुरता लागली आहे. डॉन 3 मध्ये अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता फक्त चित्रपटाचे लाल रंगामध्ये मोशन पोस्टर आऊट करण्यात आले आहे.

अभिनेता शाहरुख खानचा ‘डॉन’ हा चित्रपट (DON Movie) 2006 साली प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर याने केले होते. ‘डॉन’ या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच प्रियांका चोप्रा
(Priyanka Chopra) व करिना कपूर (Kareena Kapoor) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. 38 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने 106.34 कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता. या चित्रपटाचा पुढचा सिक्विल अर्थात ‘डॉन 2’ हा चित्रपट (Don 2 Movie) देखील 5 वर्षानंतर रिलीज झाला होता. ‘डॉन 2’ मध्ये शाहरुखसोबत प्रियांका चोप्रा व लारा दत्ता (Lara Dutta) यांनी भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. आता लवकरच ‘डॉन 3’ चित्रपट (Don 3 Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून प्रेक्षक देखील या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम

Pushpa 2: The Rule | ‘पुष्पा 2’ चित्रपटातील व्हिलन फहाद फासिलचा लूक आऊट

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडेने केले दुसऱ्यांदा लग्न; लिपलॉक करताना व्हिडिओ व्हायरल

Rati Pandey | “मी पूर्ण दिवस एका बिस्किटावर काढायचे…”; अभिनेत्री रति पांडेनी सांगितला स्ट्रगल पीरियडमधील अनुभव