थेट जेलमध्येच अंडरवर्ल्ड डॉनची गोळ्या घालून खून

बागपत : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात अंडरवर्ल्ड डॉन प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. महत्वाचे म्हणजे मुन्ना बजरंगीची पत्नी सीमा सिंह हिने २९ जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मुन्नाची जेलमध्ये हत्या होऊ शकते, अशी भिती व्यक्त केली होती. जेलमध्ये घडलेल्या या घटनेने जेल प्रशासनापासून लखनौमधील अधिका-यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रंगदारीशी संबंधित एका खटल्याच्या निमित्ताने मुन्ना बजरंगी आज बागपत कोर्टात हजर राहणार होता.

[amazon_link asins=’B019XSHB7O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5c51b16-8337-11e8-9036-57cbb0f6f30c’]

विशेष म्हणजे मुन्ना बजरंगीला रविवारी रात्रीच झाशी जेलमधून बागपत जेलमध्ये हलवले होते. बागपतमध्ये सोमवारी रेल्वेशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी होती. त्यामुळे रविवारी रात्री ९ वाजताच मुन्ना बजरंगीला बागपत जेलमध्ये हलविण्यात आले होते.

मुन्ना बजरंगीच्या हत्येमागे पश्चिम यूपी आणि उत्तराखंडमध्ये सक्रिय असलेल्या सुनील राठी गँगचा हात असल्याचं म्हटले जात आहे. सुनील राठी गँगच्या शूटर्सनी मुन्ना बजरंगीला गोळी मारल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आले असून पुढील तपासातच याला दुजोरा मिळेल, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक चंद्र प्रकाश यांनी सांगितले.

मुन्ना बजरंगीचा काळा इतिहास

मुन्ना बजरंगीची गणना पूर्वांचल कुख्यात गुन्हेगारांमध्ये होते. अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये बजरंगीचा समावेश आहे. त्याचा जन्म १९६७ मध्ये उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील पूरेदयाल गावात झाला होता. बजरंगीने पाचवी इयत्तेतच शाळा सोडून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले.

जेलमध्ये मुन्ना बजरंगीच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जेलमध्ये हत्या झाल्याने प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहे. याप्रकरणी चार जणांना निलंबित करण्यात आले आहे.