कोरोनाबाधितांना रक्ताची मदत करण्यासाठी रक्तदान करा – मिनाझ मेमन

पुणे : रिपाइंच्या हडपसर विधानसभा अध्यक्षा मिनाझ मेमन म्हणाल्या की, मागिल वर्षापासून कोरोना महामारीमध्ये रक्त मिळत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यासाठी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त जमा करून रुग्णांचा जीव वाचविण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, असे मत रिपाइंच्या हडपसर विधानसभा अध्यक्षा मिनाझ इम्पतियाज मेमन यांनी सांगितले.

हडपसर (15 नंबर, विठ्ठलनगर) येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन रिपाइंच्या शहराध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, रामभाऊ कर्वे, रिपाइं हडपसर विधानसभा अध्यक्ष संतोष खरात, शिवसेनेचे सतीष जगताप, आजाद लाला शेख, इसूफ मेमन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर दोनजणांनी प्लाझ्मा दान करून करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. त्यांना रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गुलाबपुष्प देत स्वागत केले. रक्त जमा करण्यासाठी हडपसर गाडीतळ येथील अक्षय ब्लड सेंटरचे मोठे सहकार्य लाभले.

रिपाइं हडपसर विधानसभा अध्यक्षा मिनाझ मेमन म्हणाल्या की, मागिल वर्षांपेक्षा मागिल दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयांची संख्या अपुरी पडत आहे, त्यातच रक्त आणि प्लाझ्माचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी संस्था, संघटना आणि मंडळांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णांना रक्त देण्यासाठी मदतीचा हात द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.