जावयाने हुंडा मागितल्यानंतर सासुरवाडीच्या लोकांकडून झाडाला बांधून यथेच्च ‘धुलाई’

पटणा : वृत्तसंस्था – लग्नामध्ये हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा असला तरी त्यातून पळवाट काढून जावयाला भेट स्वरूपात हुंडा दिला जातो. हुंडा दिला नाहीतर वर पक्षाकडून हुंड्याची मागणी केली जाते. मात्र, बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये एका जावयाने धाडस करून सासरवाडीत जाऊन हुंडा मागण्याचे धाडस केले. जावयाने हूंडा मागितल्यानंतर सासुरवाडीकडून जावयाची चांगलीच सरबराई करण्यात आली. जावयाला झाडाला बंधून त्याची यथेच्च धुलाई केली.

मुझफ्फुरमधील अवधेश कुमार यांचा मुलीचा विवाह वैशाली येथील नटवरलाल याच्याशी २०११ मध्ये झाला. लग्नानंतर पहिले चार वर्षे व्यवस्थीत सुरु होते. मात्र, त्यानंतर नटवरलालने तू लग्नात हुंडा घेऊन आली नाहीस, माहेराहून पैसे घेऊन ये यासाठी त्याने पत्नीकडे तगादा लावला. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण होऊ लागले. नटवरलालने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार समजल्यानंतर नातेवाईकांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच गावातील पंचायतीमध्ये या मुद्यावरून समजवण्याच प्रयत्न केला. मात्र, नटवरलाल ऐकत नसल्याने पत्नी माहेरी निघून गेली. पतीच्या वारंवार मारहाणीमुळे तिने माहेरी जाऊन घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात दाखल केला.

दरम्यान जावयाने सोमवारी सासुरवाडी गाठली. याठिकाणी त्याने सर्वांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी त्याला हुड्यावरून मुलीला मारहाण करतोस म्हणून त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. त्यावेळी त्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी आलो असल्याचे सांगून तुमची मुलगी दुसऱ्या व्यक्तीबरोबर फोनवर बोलत असल्याचा आरोप केला. यानंतर चिडलेल्या नातेवाईकांनी, नागरिकांनी आणि मुलीच्या वडीलांना त्याची चांगलीच धुलाई केली.

मुलीकडच्यांनी जावयाने घरी येऊन आपल्याला मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. मुजफ्फूर पश्चिमचे पोलीस उपायुक्त कष्णमुरारी प्रसार यांनी दोघांची बाजू ऐकून घेत दोन्ही पक्षांवर कायदेशी करावाई करण्याचे आदेश संबंधीत पोलिसांना दिले.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती