डॉ. के. व्यंकटेशम् पुण्याचे नवे पोलीस आयुक्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
 

पोलीस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला यांची बदली झाली असून नागपूरचे पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम् यांची पुण्याच्या पोलीस आयुक्‍तपदी बदली करण्यात आली आहे. डॉ. के. व्यंकटेशम् सन 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल झाले असून एकुण 11 अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’723611c6-93e5-11e8-8bb5-63206707b6e8′]

अप्पर पोलिस महासंचालक यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे. डॉ. के. व्यंकटेशम् (पोलिस आयुक्‍त, नागपूर ते पोलिस आयुक्‍त, पुणे) हेमंत नामदेवराव नगराळे (आयुक्‍त, नवी मुंबई ते अप्पर पोलिस महासंचालक, सामुग्री व तरतुद, पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई), परमबीर सिंह (पोलिस आयुक्‍त, ठाणे ते अप्पर पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई), रजनीश शेठ (प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग ते अप्पर पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई), डॉ. भुषणकुमार उपाध्याय (अप्पर पोलिस महासंचालक, कारागृह महानिरीक्षक व सुधार सेवा ते पोलिस आयुक्‍त, नागपूर), संजय कुमार (अप्पर महासंचालक, सीआयडी ते पोलिस आयुक्‍त, नवी मुंबई), संजीव के. सिंघल (अप्पर पोलिस महासंचालक, सीआयडी (अभिलेख केंद्र) ते अप्पर पोलिस महासंचालक, सीआयडी), विवेक फणसळकर (अप्पर पोलिस महासंचालक, एसीबी ते पोलिस आयुक्‍त, ठाणे शहर), आर.के. पद्मनाभण (अप्पर पोलिस महासंचालक, वाहतूक ते पोलिस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड), अमिताभ गुप्‍ता (अप्पर पोलिस महासंचालक, नियंत्रक वैद्यमापन शास्त्र ते प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग) आणि श्रीमती रश्मी शुक्‍ला (पोलिस आयुक्‍त, पुणे ते अप्पर पोलिस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य).

नवी मुंबई आयुक्तपदी संजय कुमार

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी पद्मनाभन्

पोलीस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला यांची बदली

विवेक फणसळकर ठाण्याचे नवे पोलीस आयुक्‍त