Dr. Mangala Narlikar Passed Away | डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ गणितीतज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Mangala Narlikar Passed Away : जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (Dr. Jayant Narlikar) यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ गणितीतज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले आहे. त्या 79 वर्षाच्या होत्या. शास्त्रज्ञ आणि लेखिका राहिलेल्या डॉ. मंगला नारळीकर यांचे पुण्यातील (Pune News) राहत्या घरी निधन झाले आहे. (Dr. Mangala Narlikar Passed Away)

 

मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. काही महिने झाले त्यांना पुन्हा एकदा कॅन्सरचा (Cancer) त्रास सुरू झाला होता. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना गीता, गिरिजा व लीलावती अशा तीन कन्या आहेत. मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठातून (Mumbai University) 1962 साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या 1964 साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले होते. (Dr. Mangala Narlikar Passed Away)

 

मंगला नारळीकर पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म 17 मे 1943 रोजी झाला. गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी त्यांचा 1965 मध्ये विवाह झाला. 1964 ते 1966 या काळात इन्स्टिट्यूट ऑफ फंटामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले. 1967 ते 1969 मध्ये केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत त्यांनी गणिताचे अध्यापन केले.

डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे गणिताच्या सोप्या वाटा,
नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं हे प्रवास वर्णन यासारखी त्यांची पुस्तके विशेष गाजली.

 

ज्येष्ठ खगोलशास्त्र डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी
आणि सहकारी म्हणून मंगला नारळीकर यांची खंबीर साथ लाभली.

 

Web Title :  Dr. Mangala Narlikar Passed Away | senior mathematician dr mangala jayant narlikar passed away at his residence in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा