Pune Police MCOCA Action | सहकारनगर परिसरात दहशत निर्माण करणार्‍या 17 जणांविरूध्द ‘मोक्का’ ! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 36 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | सहकारनगर पोलिस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीत दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड करणार्‍या सिध्दार्थ विजय गायकवाड याच्यासह त्याच्या इतर 16 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का अंतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 36 संघटित गुन्हेगारी टोळयांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

 

टोळी प्रमुख सिध्दार्थ विजय गायकवाड Siddharth Vijay Gaikwad (22), राम राजाभाऊ उमाप Ram Rajabhau Umap (23), सनी उर्फ किरण कैलास परदेशी Sunny Alias Kiran Kaillas Pardeshi (27), अमोल उर्फ नाना जालिंदर बनसोडे Amol Alias Nana Jalindar Bansode (31), समीर रज्जाक शेख Sameer Rajjak Shaikh (23), राजाभाऊ उर्फ जटाळया लक्ष्मण उमाप Rajabhau Alias Jatalya Laxman Umap (50), गणेश उर्फ भुषण कैलास परदेशी Ganesh Alias Bhushan Kaillas Pardeshi (30, सर्व रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर, पुणे),

नब्बा उर्फ नरेश सचिन दिवटे Nabba Alias Naresh Sachin Divte (26, रा. दांडेकर पुल, पुणे), हर्षद आप्पा ढेरे Harshad Appa Dhere (22, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे), शुभम उर्फ डुई अनिल ताकतोडे Shubham Alias Dui Anil Taktonde (19), विशाल शिवाजी पाटोळे Vishal Shivaji Patole (19), चेतन महादेव कांबळे Chetan Mahadev Kamble (26, सर्व रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे), गौरव अरविंद नाईकनवरे Gavrav Arvind Naiknavre (22, रा. 64/12, जय हिंद नगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्यासह 2 अल्पवयीन युवक व फरार झालेल्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांनी वरील नमुद सर्व आरोपींना अटक केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

 

 

दि. 26 जून 2023 रोजी आरोपींनी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लहुजी शक्ती सेना येथील ऑफिजवळ लोखंडी हत्यार घेवून वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे. आरोपी सिध्दार्थ गायकवाडने हा स्वतःच्या फायद्याकरिता संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण करून परिसरात दहशत निर्माण केलेली आहे. त्यांनी अनेक सामाईक तसेच स्वतंत्र गुन्हे केले आहेत. सदरील टोहीवर एकत्रित गुन्हा केलेले 4 तर स्वतंत्रपणे गुन्हा केलेले 10 असे एकुण 14 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती.

सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र गजेंद्र माळाळे
(Sr PI Surendra Gajendra Malale) यांनी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil)
यांच्यामार्फत अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil)
यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता. आता त्यास मंजुरी देण्यात आली असून एकुण 17
जणांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास
सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) हे करीत आहेत.

 

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 36 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

 

 

Web Title : Pune Police MCOCA Action | MCOCA against 17 people who created terror in Sahakarnagar area!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा