Dr Neelam Gorhe On Uddhav Thackeray | निलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरे यांना सल्ला; म्हणाल्या – ‘बाळासाहेब ठाकरी बाण्याने बोलायचे, पण…’

मुंबई : Dr Neelam Gorhe On Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा-शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप, टीका सातत्याने सुरू आहे. दोन्ही बाजूचे नेते आपली पातळी सोडून वक्तव्य करत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपा आणि शिंदे गटात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता उपसभापती निलम गोऱ्हे यांनी भूमिका मांडली आहे. (Dr Neelam Gorhe On Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेत म्हटले होते की, टरबुज्यासारखा माणूस मी पाहिलेला नाही. पण, आता टरबुज्यासारखा गोल माणूस मी पाहतो. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली होती. यानंतर भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघती टीका सुरू केली आहे. (Dr Neelam Gorhe On Uddhav Thackeray)

निलम गोऱ्हे यांनी म्हटले की, मला असे नेहमीच वाटते की, त्या दोघांचे जे नाते आहे, ते लव्ह आणि हेटचे आहे.
ते एकमेकांबद्दल प्रचंड द्वेषाने आणि त्वेषाने बोलतात. ते दोघेही खूप मोठे नेते आहेत, मतभेदाकडून मनभेदाकडे गेले आहे,
पण ही चांगली गोष्ट नाही.

गोऱ्हे म्हणाल्या, खरे सांगायचे तर देवेंद्रजींकडून मी तेवढे अपशब्द ऐकले नाहीत.
उद्धव ठाकरे यांचा ठाकरी बाणा असल्यामुळे ते बोलत असावेत.
पण, बाळासाहेब रागवून बोलले तरी हसवून ते मिटवतही होते. उद्धव ठाकरे यांनीही तसे करावे, असे मला वाटते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ