Dream Girl Trailer : हे ट्रेलर पाहिल्यानंतर हेमा मालिनींना विसरून आयुष्मान खुराणाला म्हणतील सर्व जण ‘ड्र्रीम गर्ल’

मुंबई : वृत्तसंस्था – आयुष्मान खुरानाच्या जबरदस्त अभिनय असलेला ड्रीम गर्ल या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. यात आयुष्मान खुरानाबरोबरच ‘प्यार का पंचनामा’ फेम नुसरत भरुचा देखील दिसणार आहे. परंतू ड्रीम गर्लचे कॅरक्टर नुसरतच्या ऐवजी आयुष्मान खुराना याच्या वाट्याला आले आहे. या ट्रेलरमध्ये आयुष्यमान मुलीची भूमिका साकारणार असल्याचे दिसते आहे. तो एक पूजा नावाच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. यातून तो नक्की काय काय चित्तथरार गोष्टी करते हे पाहयला मिळेल.

आयुष्मानचा कॉमेडी अंदाज –

बालाजी मोशन पिक्चरच्या या बॅनर खाली बनवण्यात आलेल्या या ड्रीम गर्लचे लेखक निर्देशक राज शांडिल्य आहेत. सिनेमामध्ये अन्नू कपूर, विजय राज, अभिषेक बनर्जी, मनजोत सिंह, निधी बिष्ट, राजेश शर्मा आणि राज भंसाली देखील पहायला मिळणार आहे. या प्रसिद्ध कलाकारांमुळे सिनेमा जबरदस्त कॉमेडी असणार असल्याचे दिसत आहे. यात आयुष्मानची धमाल कॉमेडी पहायला मिळणार आहे. यात आयुष्मानचे वडील म्हणून अन्नू कपूर भूमिका निभावणार आहेत. हा सिनेमा येत्या 13 सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

धमाकेदार दिवाळी –

या दिवाळीला आयुष्मान खुराना या धमाकेदार सिनेमातून कॉमेडी करणार आहे. या सिनेमाचा विषय तसा जुना वाटत असला तरी आयुष्मान यात एका मध्यम वर्गीय मुलाची भूमिका निभावणार आहे. जो नेहमीच रामलीला, कृष्णालीला आणि महाभारतातील राम, राधा, द्रौपदी यांच्या भूमिका निभावत असतो.

ड्रीम गर्ल हेमा मालिनी –

महिलांच्या भूमिका निभावता निभावता एक दिवस ‘मीठी बात’ सारख्या कॉल सेंटरमधून नोकरी मिळते. तेथे मुलीच्या आवाजात लोकांशी बोलायचे असते. यातून सुरु होते धमाल. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवर सर्व शहर प्रेम करायला लागते. यामुळे शहरात मारामारी आणि तोडफोड होण्यास सुरुवात होते. याच भोवती फिरणारी ही कथा सर्वांना नक्कीच आवडेल असे ट्रेलरवरुन दिसते आहे.

1977 साली आलेल्या ड्रीम गर्ल या सिनेमानंतर हेमा मालिनीला ही ओळख मिळाली होती. यात धर्मेंद्र आणि हेमा मुख्य भूमिकेत होते. परंतू आता आयुष्मान आपल्या ड्रीम गर्ल मधून ही परिभाषा बदलणार का हे पाहणे उस्तुकत्याचे ठरेल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like