Drishyam-2 | ‘दृश्यम 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मोडला कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैय्या 2’चा रेकॉर्ड

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘दृश्यम 2’ (Drishyam-2) या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर डंका मारला आहे. बॉलीवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) च्या मुख्य भूमिकेत असलेल्या दृश्यम 2 हा चित्रपट 18 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 2015 मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाचा हा सिक्वेन्स आहे. तब्बल सात वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Drishyam-2)

 

‘दृश्यम 2’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने शुक्रवारीच 14.50 कोटीचा गल्ला जमावला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. (Drishyam-2)

 

दृश्यम 2 या चित्रपटाने ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटानंतर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चांगली कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
ब्रह्मास्त्रने पहिल्या दिवशी तब्बल 36 कोटींचा गल्ला जमवला होता. तर कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) ‘भूल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील पहिल्या दिवशीचे रेकॉर्ड ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने मोडले आहे.
14.11 कोटींची कमाई भुलभुलय्या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी केली होती.
‘दृश्यम 2’ या चित्रपटात अजय देवगन (Ajay Devgn) सह तब्बू (Tabu), अक्षय खन्ना (Akshaye Khanna),
श्रीया सरन (Shriya Saran), इशिता दत्ता (Ishita Dutta) यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही (Siddharth Bodke) चित्रपटात झळकला आहे.

 

Web Title :- Drishyam-2 | drishyam-2 box office collection day 1 ajay devgn film got second best opening after brahmastra know the details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kantara OTT Release | बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा सिनेमा ‘या’ दिवशी होणार OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

Marathi Actor Mohan Joshi | अभिनेते मोहन जोशी पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

Pune Crime | मार्केटयार्ड येथे गोळीबार करुन दरोडा घालणाऱ्या 3 फरार आरोपींना पिस्टलसह अटक, गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई