Marathi Actor Mohan Joshi | अभिनेते मोहन जोशी पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा (Shree Swami Samarth) महिमा दाखवणारा सिनेमा आजही लोकांच्या लक्षात आहे. तो म्हणजे ‘देऊळ बंद’ (Deool Band) या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आजच्या जगात देखील स्वामींचे अस्तित्व दाखवणारा हा सिनेमा तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहतात. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Marathi Actor Mohan Joshi) यांनी स्वामींची भूमिका साकारली होती. जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर आता पुन्हा एकदा मोहन जोशी स्वामींच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Actor Mohan Joshi)

मोहन जोशींनी (Mohan Joshi) स्वामींच्या भूमिकेला उत्तमरीत्या निभवल्याने प्रेक्षकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले होते. देऊळ बंद सिनेमात आपल्या भक्तांशी ज्याप्रमाणे स्वामी बोलतात ही भूमिका मोहन जोशींनी उत्तमरित्या साकारली होती. तर आता पुन्हा एकदा मोहन जोशी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर हि भूमिका दिसणार आपल्याला देऊळ बंद 2 या सिनेमातून नाही तर सन मराठी (Sun Marathi) वरील ‘संत गजानन शेगावीचा’ (Sant Gajanan Shegavicha) या मालिकेत मोहन जोशी यांची इंट्री होताना दिसणार आहे.

सन मराठी वरील संत गजानन शेगावीचे ही मालिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडते.
सध्या या मालिकेत महाराजांच्या स्वामी भेटीचा सोहळा संपन्न होणार आहे.
या मालिकेच्या विशेष भागात स्वामींचे दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.
‘गजानन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे म्हणत या मालिकेत स्वामींची एन्ट्री होणार आहे.
मोहन जोशी (Mohan Joshi) पुन्हा एकदा स्वामींच्या भूमिकेत या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे कळताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

 

Web Title :- Marathi Actor Mohan Joshi | actor mohan joshi to play swami samarth maharaj role in sun marathi sant gajanan shegaviche serial

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MSEDCL | वीजबिल भरण्याबाबत बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढले; महावितरणने केले ‘हे’ आवाहन

Aaditya Thackeray | ‘मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी कर्मभूमी आहे’ – आदित्य ठाकरे

Devendra Fadnavis | “अगर ऐसे ही सिलेक्टीव्ह चीज़े पढ़ते रहोगे तो… “; ट्विट करून घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचा धडा