ATM कॅश व्हॅन ड्रायव्हरनेच पळवली ; 4.25 कोटी घेऊन पोबारा !

पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल सव्वा चार कोटी रुपये रोकड असलेले एटीएममध्ये पैसे भरणारे कॅशव्हॅन चक्क ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली( driver-hijacked-car-Rs-4-crore-atm) आहे. विहार पश्चिम येथील बोळीज भागात गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अर्नाळा पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम येथील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ही कॅशव्हॅन आली होती. त्यावेळी आरोपी ड्रायव्हरने ती पळवून नेली. रायडर कंपनीचे कंत्राट असलेल्या कॅशव्हॅनमध्ये 4 करोड 58 लाख रुपयांची रोख रक्कम होती. त्यातील आजूबाजूच्या तीन एटीएममध्ये 28 लाख रुपये भरले होते. सव्वा चार करोड रुपये गाडीत होते. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅशव्हॅन आली. गाडीतील लोडर आणि बॉडिगार्ड उतरल्यावर ड्रायव्हर आरोपी कॅशव्हॅनसह पळून गेला आहे.

कॅशव्हॅन (एम. एच . 43 बीपी 4976) ह्या नंबरची भिवंडी तालुक्यातील निर्जळनस्थळी पोलिसांना सापडली आहे. यातील चोरीचे सव्वा चार करोड रुपये चोरी करून आरोपी पसार झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी वसई गुन्हे शाखा, ठाणे येथील गुन्हे शाखेच्या तीन टीम तयार केल्या आहेत. सदर आरोपी ड्रायव्हरची ओळख, घराचा पत्ता, कागदपत्रे पोलिसांना सापडली असून, लवकरच आरोपीला पकडले जाईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.