आता Aadhar Card च्या मदतीनं पूर्ण होणार वाहन परवान्याची कामं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रस्ते वाहतूक मंत्रालयानं अलीकडेच एक मसुदा ततयार केला ज्यात वाहन मालक संपर्क रहित म्हणजे कॉन्टॅक्ट लेस सेवा घेऊ शकतात. याशिवाय परिवहन विभागाचे काम रांगा लावून करण्याऐवजी आधार कार्ड वापरून सोप्या पद्धतीनं करण्यास ते सक्षम असतील.

या मसुद्यात परवाना मिळवणं, डीएलचं नुतनीकरण करणं, पत्ता बदलणं, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हींग लायसन्ससह वाहन कागदपत्रांचं हस्तांतरण करणं यासह 16 इतर सेवांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी आधारचं प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. आधार प्रमाणीकरण घरच्या घरी देखील केलं जाऊ शकतं.

बनावट परवान्यांवर घातली जाणार बंदी
आधार प्रमाणीकरण बनावट परवाने वारणाऱ्यांवर बंदी आणेल आणि कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त वाहन चालक परवाना वापरण्यास सक्षम राहणार नाही. याचं स्पष्टीकरण देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, लोक ऑनलाईन सेवांसाठी अधिक पर्याय निवडत आहेत आणि आम्ही ते जास्तीत जास्त वापरलं जाईल अशी आशा करतो.

ड्रायव्हींग टेस्ट देण्याची गरज नाही’
सरकार आता ड्रायव्हींग लायसन्स मिळवण्याच्या प्रक्रियेतही बदल करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अशी तरतूद करत आहे की, वाहन चालवण्यासाठी प्रशिक्षण केंद्राचं प्रशिक्षण घेतल्यानंतर ड्रायव्हींग परवान्यासाठी अर्ज करताना कोणालाही ड्रायव्हींग टेस्ट देण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की, आपण ड्रायव्हींग प्रशिक्षण केंद्रावरून वाहन चालवायला शिकला तर परवान्यासाठी आपल्याला कोणतीही चाचणी देण्याची गरज नाही. या योजनेवर सरकारनं काम सुरू केलं आहे.