महाराष्ट्राच्या ‘या’ 4 जिल्ह्यात आजपासून कोरोना व्हायरस व्हॅक्सीनची ‘ड्राय रन’

नवी दिल्ली : देशभरात लवकरात लवकर कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनच्या (Coronavirus Vaccine ) वापराला मंजूरी देण्याच्या हेतूसह आज शनिवारपासून देशभरात ड्राय रन सुरू होत आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांमध्ये ही ड्राय रन सुरू होत आहे. ड्राय रन सर्व राज्यांमध्ये किमान तीन साईटवर होईल. काही राज्य त्या भागांनाही ड्राय रनमध्ये सहभागी करतील जे दुर्गम असतील आणि सामानाची वाहतूक करणे अवघड असेल.

महाराष्ट्र आणि केरळ आपल्या राजधानीपासून इतर मोठ्या शहरात ड्राय रन करतील. ड्राय रनच्या दरम्यान हे पाहिले जाईल की, लसीकरणासाठी लोकांची ऑनलाइन नोंदणी, डाटा एंट्री, लोकांच्या मोबाइलवर मॅसेज पाठवणे आणि लसीकरणानंतर इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्र जारी करण्यात कोणते अडथळा तर येत नाहीत. मॉकड्रिलचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन सुद्धा निरीक्षण करतील.

या ड्राय रनसाठी सुमारे 96 हजार व्हॅक्सीनेटर्सला ट्रेनिंग देण्यात आले आहे. 2 हजार 360 लोकांना नॅशनल ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स आणि 57000 पेक्षा जास्त लोकांना जिल्हा स्तरावर 719 जिल्ह्यांमध्ये ट्रेनिंग मिळाले आहे.

महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्यात ड्राय रन
कोरोना व्हायरसने सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यात आज ड्राय रन घेण्यात येईल. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. हे चार जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, विदर्भातील नागपुर, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि मध्य महाराष्ट्रातील जालना जिल्हा आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन आरोग्य केंद्र आणि 25 आरोग्य कर्मचारी या मॉक ड्रिलसाठी निवडण्यात आले आहेत.