DSK यांच्या महागड्या गाड्यांचा लिलाव करण्यास कोर्टाची मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णीं यांच्या सहा आलिशान गाड्या आज आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या. यामध्ये पोर्षे, दोन बीएमडब्ल्यू, एमव्ही आगस्ट या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची किंमत कोट्यावधी रुपये असून त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. या गाड्यांचा लिलाव करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत डीएसके यांच्या महागड्या आणि अलिशान गाड्यांचा लिलाव करण्याची परवानगी विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या न्यायालयाने दिली आहे.

डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांनी गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार समोर आला. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रारंभी डीएसके यांच्या मालमत्ता जप्त करण्यावर प्राधान्य दिले होते. यानंतर त्यांच्याकडे असलेल्या अलिशान आणि महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. डीएसके यांच्याकडे असेलेल्या २० अलिशान गाड्या पोलिसांनी फेब्रुवारी आणि मार्च २०१८ मध्ये जप्त केल्या होत्या.

जप्त केलेल्या गाड्यांमध्ये दोन पांढऱ्या शुभ्र रंगाच्या दोन BMW, लाल पोर्शे, दोन टोयाटा या चारचाकी गाड्यासह एमव्ही ऑगस्टा ही दुचाकी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर दोन इनोव्हा, कोरेला अल्टी, क्लालीस, इटीऑस अशा एकूण २० गाड्या जप्त करून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आल्या होत्या. दरम्यान डीएसके यांच्याकडील अलिशान व महागड्या गाड्या एकाच ठिकाणी पडून असल्याने त्या खराब होऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्या गाड्यांचा तातडीने लिलाव करुन देण्यात यावा अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केल्याने डीएसके यांच्या गाड्यांचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –