मुसळधार पावसामुळे वडाळ्यात रस्ता खचला, कामगार अडकल्याची भीती

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन 

पावसामुळे मुंबईतील वडाळा येथील भक्ती पार्क मध्ये दोस्ती नावाच्या इमारतींबाहेरील रस्ता खचला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0a77aa0-784e-11e8-b7f4-81ce8101b03f’]

या ठिकाणी पार्क केलेल्या अनेक कार ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्या आहेत. या घटनेत  मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ही घटना  झाल्यानंतर या इमारतीच्या दोन विंग रिकाम्या करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोसळलेल्या भिंतीखाली कामगार अडकल्याचं भिती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे परिसरातील बांधकामाविषयी स्थानिकांनी तक्रारी करूनही पालिकेने आजवर डोळेझाक केली आहे.