संविधानाच्या प्रति जाळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील  विद्यार्थ्यांकडून मनुस्मृतीचे दहन

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-

दिल्लीतील जंतरमंंतरवर भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत मनुस्मृतीचे दहन केले. तसेच यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक वाचनही केले.
[amazon_link asins=’B00D5SMDSQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’448d5754-9d78-11e8-9ed5-ff54d4664313′]

मागील दोन दिवसापूर्वी जंतरमंतर येथे काही व्यक्तींनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिअो समोर आल्यानंतर देशभरात याचा निषेध केला जात आहे. संविधान जाळणाऱ्यांवर तात्काळ देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज सकाळी गरवारे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी मनुस्मृतीच्या पोस्टरचे दहन केले.
[amazon_link asins=’B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’498aa729-9d78-11e8-88ed-e3d2f2ba38a9′]
तसेच संविधान जाळणाऱ्यांचे नागरिकत्व काढून घेण्याची मागणीही यावेळी करण्यात अाली. या अांदाेलनात 30 ते 40 विद्यार्थी सहभागी झाले हाेते. यावेळी संविधानाच्या जयजयकाराच्या घाेषणाही देण्यात अाल्या.   यावेळी सागर अलकुंटे याने आपले मनोगत व्यक्त केले, तो म्हणाला ज्या दिवसापासून भाजप सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून देशात अनेक संविधान  विरोधी घटना घडल्या आहेत. सरकार या घटनांना व आरोपींना पाठीशी घालत आहे. अद्याप देखील दोषींवर कारवाई केली जात नाही.