थेऊर जवळील नदीत महिलेसह दोन मुले बुडाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जिल्हयातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेली महिला आणि तिचे दोन मुली वाहुन गेल्याची धक्‍कादायक घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

जाहिरात

चंद्रकला राजू भूल (30, रा. थेऊर), भजन भरतसिंह भूल (22) आणि सोनिया राजू भूल (4) अशी पाण्यात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला भूल या कपडे धुण्यासाठी थेऊर येथील नदी पात्रात गेल्या होत्या. काही वेळात चंद्रकला, भजन आणि सोनिया हे पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली. लोणी काळभोर पोलिसांना त्याबाबत खबर मिळाली.

आमरण उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलचे मृत्युपत्र जाहीर

त्यानंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील आणि इतर अधिकारी थेऊर येथे रवाना झाले. चंद्रकला आणि इतरांना शोधण्याचे काम चालु असल्याची महिती देण्यात आली आहे. दरम्यान, पाण्यात चंद्रकला आणि इतर दोन जण वाहून गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस अधिक तपास करीत आहेत. चंद्रकला, भजन आणि सोनिया या कशा पाण्यात वाहून गेल्या याबाबत पोलिस तपास करीत आहेत. परिसरातील नागरिकांची त्याबाबत मदत घेतली जात आहे.

सातारा : ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी धरला ठेका!

जाहिरात