पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यामुळे, विधानभवनासमोरच त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : पाेलीसनामा ऑनलाईन

पोलिसानी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यामुळे आज (गुरूवार) विधानभवनासमोरच एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. आशिष आमदरे असे व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अाशिष हे दिव्यांग आहेत. प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce08e0cb-8b46-11e8-9a37-33f5eb3f8ba0′]

दरम्यान, बुधवारी देखील विधानभवन परिसरात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. महापालिकेतील एका बडतर्फ कर्मचाऱ्याने विधानभवनासमोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. मात्र, बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला. प्रकाश बर्डे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो महापालिकेच्या अग्निशमन विभागात वाहनचालक म्हणून कार्यरत होता.