व्यायाम करताना तरुणाला जिममध्येच कार्डियाक अरेस्ट

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

आजकालच्या तरुणाईमध्ये जिम वर्कआऊट चा ट्रेंड भलताच वाढतो आहे. पण व्यायाम करीत असताना जिम ट्रेनरकडून आवश्यक ती  काळजी घेऊनच व्यायाम केला पाहिजे. मुंबई येथील २२ वर्षीय तरुण जिममध्ये वेट लिफ्टिंग करीत असताना त्याला कार्डियाक अरेस्ट आल्यामुळे अचानक कोसळला. अदनान मेनन असे या तरुणाचे नाव आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c07eda9b-8cdd-11e8-a220-19b926559199′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सात जुलै रोजी मसल अॅण्ड माईंड या जिममध्ये अदनानला  व्यायाम करीत असताना कार्डियाक अरेस्ट आला. तो खाली कोसळला. इतर सहकाऱ्यांनी तातडीने त्याला जवळच्या साबो सिद्दीकी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, त्याला कार्डियाक्ट अरेस्ट आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नंतर त्याला ब्रेन हॅमरेजही झाले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिममध्ये असलेल्या  सीसीटीव्हीचे  फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार्डियाक अरेस्ट आला तर काय करावे
मुळात कार्डियाक अरेस्ट कोणत्याही वयात येऊ शकतो. त्यामुळे जिम करताना ट्रेनरचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेकदा कार्डियाक अरेस्ट आला तर काय करायला हवे याचे ज्ञान लोकांना नसते. अशावेळी त्या व्यक्तीला जमिनीवर झोपवून त्याला कृत्रिम श्वास द्यावा. यामुळे त्या व्यक्तीला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि त्याने ब्रेन हॅमरेज होत नाही कार्डियाक अरेस्ट हा अनुवंशिकही असतो. अनेकांना आपली मेडिकल हिस्ट्री माहित नसल्यामुळे ते अशा गोष्टींपासून अनभिज्ञ राहतात.