Teaser : MS धोनीच्या वाढदिवशी रिलीज होणार DJ ब्रावोचं ‘हे’ खास गाणं, शेअर केला टीजर ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी येत्या 7 जुलै रोजी 39 वर्षांचा होणार आहे. माहीचे चाहतेही त्याच्या वाढदिवसाच्या तयारीला लागले आहे. खास बात अशी की, आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीची टीम चेन्नई सुपरकिंग्सचा जबरदस्त ऑलराऊंडर ड्वेन ब्रावो हा देखील धोनीला खास गिफ्ट देण्याचं प्लॅनिंग करत आहे. म्युझिकमध्ये रस असणारा डीजे ब्रावो धोनीसाठी खास गाणं तयार करत आहे ज्याचा टीजरही रिलीज करण्यात आला आहे.

डीजे ब्रावोनं त्याच्या इंस्टावरून या गाण्याचा टीजर शेअर केला आहे. हे गाणं धोनीच्या वाढदिवशी रिलीज केलं जाणार आहे. ब्रावो अजूनही गाणयाच्या मेकिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानं धोनीच्या चाहत्यांकडं काही डान्स स्टेप्ससाठी मदत मागितली आहे ज्या धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट्ससोबत मिळत्या जुळत्या असतील. चाहत्यांकडून आलेल्या स्टेप्स तो डान्ससाठी वापरणार आहे असंही त्यानं सांगितलं आहे. या गाण्याचे बोलही खूप शानदार आहेत.

या गाण्याचं नाव MS Dhoni Number 7 आहे. ब्रावोनं या गाण्यात धोनी या शब्दाव्यतिरीक्त माही, इंडिया, रांची, चेन्नई, थाला अशा काही शब्दांचा वापर केला आहे. इंस्टावरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत.