‘घरी किंवा गडचिरोलीला जायची तयारी, भीती घालू नका’  माजी मंत्र्यांना डीवायएसपीचा दणका !

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईन – सध्या एका पोलीस अधिकाऱ्याचा एक व्हिडीआे चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. कोल्हापूरातील या अधिकाऱ्यावर सध्या सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना या अधिकाऱ्याने दिलेल्या बाणेदार उत्तराने सर्वांजण प्रभावित झाले असून त्यांच्या उत्तराने त्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. सुरज गुरव असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. हा व्हिडीओ सोशल माध्यमात वायरल झाल्याने चर्चेचा विषय बनल्याचं दिसत आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी महापालिकेत नगरसेवक वगळता इतरांना प्रवेश नव्हता. ओळखपत्र पाहून आत सोडण्यावरून आमदार हसन मुश्रीफ, यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे बंदोबस्तावर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव आणि मुश्रीफ यांच्यात वादावादी झाली. यानंतर यावेळी सुरज गुरव यांनी बाणेदारपणे उत्तर देत म्हटले की, “एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो , पण भीती घालू नका. आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. आपण घरी जावे.

“यानंतर गुरव यांचा हा व्हिडीआे सोशल मीडिया चांगलचा व्हायरल होताना दिसत आहे इतकेच नाही तर त्यांनी दिलेल्या या बाणेदार उत्तरामुळे सोशल मीडिया द्वारे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. गुरव यांनी परवानगी नसताना महापालिकेत प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँगेसचे आमदार सतेज पाटील यांना रोखत तिथून माघारी पाठवले.  गुरव यांनी आमदारांच्या दबावासमोर न झुकता स्पष्ट वक्तेपणाची रोखठोक भूमिका घेतल्याने त्याची चर्चा आणि कौतुक होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकरिता सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास काँग्रेस -राष्ट्रवादीचे नगरसेवक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात दाखल झाले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येकाला ओळखपत्र दाखवूनच आत सोडण्यात येत होते. ओळखपत्र पाहून आत सोडण्यावरून आमदार हसन मुश्रीफ , यांनी आक्षेप घेतला. मात्र यावेळी पोलीस आपल्या  भूमिकेवर  ठाम होते. यावरूनच ड्युटीला असलेले पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव आणि मुश्रीफ  यांच्यात वादावादी झाली. यावेळी पोलिस उपअधीक्षक गुरव यांनी ‘आम्ही नोकरी करतो, राजकारण करत नाही’असे उदगार काढले  यावेळी काहीही बोलू नका असे आमदार मुश्रीफ यांना सांगितले.या प्रकारानंतर  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. या प्रकारामुळे मोठा तणाव याठिकाणी निर्माण झाला होता.