
सरकारचा मोठा निर्णय ! इनकम टॅक्स रिटर्न्सची अंतिम तारीख वाढवली, आता 30 सप्टेंबरपर्यंत करू शकता दाखल
पोलिसनामा ऑनलाइन: आता सरकारने वित्तवर्ष 2018-19 साठीचा आयकर भरण्याबद्दल देयकांना दिलासा दिला आहे. सरकारने आयकर भरण्याची तारीख (Income Tax Filling Deadline) वाढवली आहे. आयकर विभाग ( Income Tax Department ) याबद्दल म्हणाला आहे की, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून कर देयकांना आधार देण्यासाठी सीबीडीटी म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT-Central Board of Direct Taxes) कर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 वरून 30 सप्टेंबर 2020 केली आहे. यामुळे आता ही तारीख पुढे ढकलण्याची तिसरी वेळ आहे.
Covid महामारी द्वारा उत्पन्न कठिनाइयों को ध्यान में रखते हुए एवं करदाताओं द्वारा अनुपालन को और सरल करने हेतु, कें.प्र.क.बो. ने,वित्त वर्ष 2018-19(नि.व. 2019-20)की आयकर रिटर्न दाखिल करने की नियत तिथि को 31जुलाई,2020 से 30 सितंबर,2020 तक,दिनांक 29/7/2020 को अधिसूचना जारी कर बढ़ाया। pic.twitter.com/Ts9TPXR6IG
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 29, 2020
सीबीडीटीने आयकर भरण्याची मुदत सलग तीनदा बदलली आहे. सुरुवातीला 2018-19 चा आयकर भरण्याची मुदत 31 मार्च 2020 होती. सुरुवातीला ही तारीख 30 जूनपर्यंत वाढवली होती. नंतर एकदा ती मुदत 31 जुलैपर्यंत नेली होती. आता ही आयकर भरण्याची मुदत 30 सप्टेंबर केली आहे.
CBDT ने सादर केलेल्या अहवालानुसार, काही असे कर देयक आहेत ज्यांनी मोठे व्यवहार केले आहेत, पण त्यांनी याचा उल्लेख असेसमेंट ईयर 2019-20 (वित्त वर्ष- 2018-19 ) मध्ये केला नाही. बऱ्याच जणांचे व्यवहार आणि त्यांचा आयकर रिटर्नचा मेळही बसत नाहीये. अशा लोकांना विभागाने ट्रेस केले असून या कारणांमुळेच ही मुदत वाढवली जात असल्याचं बोललं जात आहे.
कर विभागाचे 31 जुलैपर्यंत जे ई-कॅम्पेन चालणार आहे त्यात अशा लोकांवर लक्ष केंद्रित केलं जाईल ज्यांनी अजून रिटर्न दाखल केला नाही. तसेच ज्यांनी दाखल केला आहे त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, त्याचीही चाचपणी केली जाणार आहे. याची माहिती देयकांना ई-मेल आणि मॅसेज करून दिली जाईल.