Earn Money | नोकरी सोडून तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ सुपरहिट बिझनेस, दरमहा आरामात होईल 5-10 लाखांची कमाई; जाणून घ्या कशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्ही नवीन बिसनेस सुरु करण्याचा विचार (Business Idea) करत असाल तर हि बातमी तुमच्या उपयोगी पडेल. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल (How to start own business) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही महिन्याला 5 लाख रुपये (Earn money) कमवू शकता. आजकाल बॉक्सला (cardboard business) खूप मागणी आहे. ऑनलाइन बिजनेस मध्ये कार्डबोर्डची सर्वाधिक गरज असते. आजकाल लहान-मोठ्या सर्व वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी बॉक्सची गरज भासते.

 

ह्या व्यवसायातून तुम्ही खूप नफा मिळवू शकता आणि विशेष म्हणजे त्याची मागणी वर्षभर एकसारखीच राहते, म्हणजेच या व्यवसायाला मंदी खूप कमी आहे. चला तर जाणून घ्या महिन्याला ५ ते १० लाखांची कमाई कशी करायची.

 

कच्चा माल किती आवश्यक आहे?

कच्च्या मालाबद्दल बोलायचे झाले तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी क्राफ्ट पेपर हा सर्वात महत्वाचा आहे. तुम्हाला तो बाजारात सुमारे 40 रुपये किलोने मिळेल. तुमचा क्राफ्ट पेपर जितका चांगला असेल तितकी बॉक्सची क्वॉलिटी देखील चांगली असेल.

 

किती जागा लागेल?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला सुमारे 5000 चौरस फूट जागा लागेल कारण या व्यवसायात तुम्हाला एक फ्लॅट उभारावा लागेल तसेच माल ठेवण्यासाठी गोदामाची आवश्यकता आहे. गर्दीच्या ठिकाणी कार्डबोर्ड बॉक्सचा व्यवसाय सुरू करू नका कारण अश्या परिस्थिती तुम्हाला सामानची ने-आण करणे त्रासदायी होईल. बहुतांश लोक हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात.

 

मशीन देखील आवश्यक आहे.

या व्यवसायात दोन प्रकारची मशीन्स आहेत, पहिली सेमी ऑटोमॅटिक मशीन (Semi Automatic Machine) आणि दुसरी फुल्ली ऑटोमॅटिक मशीन (Fully Automatic Machine). ह्या दोन्ही मध्ये जेवढा इन्वेस्टमेंटचा फरक आहे तेवढाच आकारामध्ये फरक आहे.

 

जाणून घ्या किती होईल नफा?

या व्यवसायातील प्रॉफिटबद्दल बोलायचे झाले तर त्याची मागणी वर्षभर सारखीच असते
आणि कोरोनाच्या काळात अशा बॉक्सची मागणी खूप वाढली आहे.
विशेष बाब म्हणजे या व्यवसायातील नफ्याचे प्रमाणही खूप जास्त आहे,
जर तुम्ही ग्राहक तयार करू शकत असाल आणि चांगले मार्केटिंग करता येत असेल
तर हा व्यवसाय सुरू करून तुम्ही महिन्याला सहज ५ ते १० लाख रुपये कमावू शकता. (Earn Money)

 

तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल?

गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर, जर तुम्हाला हा बिजनेस छोट्या प्रमाणावर करायचा असेल
तर तुम्हाला कमी प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल.
या बिझनेस साठी लागणाऱ्या मशीन जरा महाग आहेत.
जर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतली तर तुम्हाला २० लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.
तसेच फुल ऑटोमेटिक मशीनला 50 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल.

 

Web Title :- Earn Money | start cardboard business with small amount and earn 10 lakh rupees monthly check know how Earn money

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा