‘या’ कारणामुळे आज रात्री 1 तास जगभरात वीज बंद राहणार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पर्यावरण वाचवणे आणि विजेची बचत करणं या हेतूनं World Wide Fund for Nature या संस्थेनं एक अभियान सुरु केलं आहे. अर्थ अवर डे असं या अभियानाचं नाव असून आज अर्थ अवर डे आहे. पर्यावरण वाचवणं सोबतच विजेची बचत करणं हा या अभियानाचा प्रमुख हेतू असल्याचं संस्थेने स्पष्ट केलं आहे.

Change the Way We Live अशी या संस्थेची घोषणा आहे. अर्थ अवर डे या अभियानाअंतर्गत लोकांना एक तास वीज बंद ठेवण्याचं आव्हान केलं जातं. या अभियानात सहभागी होणाऱ्यांनी रात्री 8.30 वाजता एक तास लाईट्स बंद ठेवायचे आहेत.

पूर्ण जगभरात हे अभियान पाळलं जातं. या अभियानाअंतर्गत ऑफिस किंवा घर असं सगळीकडेच एक तास वीज बंद ठेवायला सांगितले जाते. सिडनीने या अभियानाअंतर्गत सर्व लाईट बंद ठेवले होते. सिडनीमध्ये लाइट्स बंद केल्यानंतर त्यापासून प्रेरीत होऊन जगभरातल्या 162 देशांमध्ये लाइट्स बंद केले गेले. 2017 मध्ये 172 देशांनी या अभियानाचा स्वीकार केला होता. दरम्यान 2007 पासून हे अभियान चर्चेत असल्याचं समोर आलं आहे.

World Wide Fund for Nature या संस्थेला 100 पेक्षा अधिक देशातील 5 अब्ज लोक पाठिंबा देत आहेत. दरम्यान जगात सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती ही स्पेनमध्ये होते आणि स्पेननंतर जर्मनीचा नंबर लागतो. याशिवाय भारत, गुजरात, राजस्थान आणि ओडिसी या ठिकाणीही उर्जा निर्मिती केली जाते.

जर तुम्हाला वीज बचत करायची असेल तर, तुम्ही पिवळ्या बल्बचा वापर टाळायला हवा कारण पिवळ्या बल्बमुळे जास्त वीज खर्च होते. दरम्यान सीएफएल आणि एलईडीमुळेही वीजेची बचत होण्यास मदत होते. सध्या जगभरात वीज वाचवण्यासाठी काम सुरू आहे. वायफायनेही वीज मिळेल असे प्रयत्नही सुरू आहेत. स्वीडनमध्ये सौरउर्जा एकत्र करून रात्रीही उपयोग कसा करता येईल, ते पाहिलं जातं आहे.