Earthquake in Delhi : दिल्लीत सकाळी-सकाळी हादरली जमीन, रिश्टर स्केलवर 2.3 नोंदली गेली भूकंपाची तीव्रता

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे झटके जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, भूकंपाचे झटके शुक्रवारी सकाळी 5:02 वाजता जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.3 नोंदली गेली. दिल्लीत मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे झटके सातत्याने जाणवत आहेत.

दिल्लीसोबतच एनसीआरच्या काही भागात सुद्धा हलके धक्के जाणावले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि गाझियाबादमध्ये सुद्धा लोकांना धक्के जाणवले. मात्र, यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.