WB Elections 2021 : नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 16 व्या राऊंडला 6 मतांनी पिछाडीवर

वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 201 जागांवर आघाडी मिळालेली आहे. मात्र, संपुर्ण देशाचं लक्ष असलेल्या नंदीग्राम मतदार संघात मृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी या 16 व्या राऊंड अखेर 6 मतांनी पिछाडीवर आहेत. भाजपचे सुवेंदू अधिकारी हे बॅनर्जी यांच्यापेक्षा केवळ 6 मतांनी पुढं आहेत.

नंदीग्राममध्ये कोण जिंकणार याकडे देशाचे लक्ष लागले असतानाच बॅनर्जी 6 मतांनी पिछाडीवर असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. आगामी काही वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे. सध्यातरी 16 व्या राऊंड अखेर ममता बॅनर्जी या केवळ 6 मतांनी पिछाडीवर आहेत.