तळेगावमध्ये विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

तळेगाव : पोलीसनामा ऑनलाईन

तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत एकदिवसीय ‘पर्यावरण पूरक गणेश निर्माण’ शिबीर संपन्न झाले. विद्यार्थ्यांला पर्यावरण पुरक मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण रमा घारे, सानिका बोन्द्रे आणि सौरभ खाडिलकर यांनी दिले.

आता एवढेच बाकी होते … गुगल शिकवणार शास्त्रशुद्ध शेतीचे धडे ?

पर्यावरणपूरक उपक्रम निसर्ग संवर्धनासाठी उपयुक्त असतात म्हणून नैसर्गिक माती, खते, रंग आदी घटकांपासून गणेश मूर्ती बनविण्यात आल्या. यामध्ये पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती शिबिराचे समन्वयक प्रा. स्वप्नील बंडगर यांनी दिली.
[amazon_link asins=’B01L1IULRG,B01MFXCZ5A’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ee611a6-ad18-11e8-b527-b544be5d6334′]
गणेश मूर्ती विसर्जनानंतर आपोआप विरघळणे शक्य व्हावे म्हणून शाडूची माती वापरून मूर्ती करण्यात आल्या. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केवळ काही तासांतच हे प्रशिक्षण पूर्ण करून स्वतः मूर्ती बनविल्या. या मूर्तींचे प्रदर्शन देखील या वेळी करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी विकसन अधिकारी प्रा. विजय नवले, प्रा. नितीन धवस, प्रा. मनोज काटे, प्रा. सुलभा गडलिंग, प्रा. रामदास बिरादार आदी उपस्थित होते.