ED Raid on Pooja Singhal IAS | आयएएस पूजा सिंघल यांच्या ठिकाणांवर ED ची छापेमारी, 25 कोटींची रोकड जप्त

रांची : वृत्तसंस्था – ED Raid on Pooja Singhal IAS | बेकायदेशीर खाण प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या 20 ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील रांची, खूंटी, राजस्थानमधील जयपूर, हरियाणातील फरिदाबाद आणि गुरुग्राम, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बिहारमधील मुझफ्फरपूर आणि दिल्ली एनसीआरमध्ये ही ठिकाणे आहेत. (ED Raid on Pooja Singhal IAS)

 

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सिंघल यांच्या घरातून मोठी रोकड (सुमारे 25 कोटी) जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आल्याचीही माहिती आहे. हे पैसे त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटकडून (सीए) जप्त करण्यात आले आहेत.

 

रांचीमधील कांके रोडवरील चांदणी चौक येथील पंचवटी रेसिडेन्सीचा ब्लॉक क्रमांक 9, लालपूर येथील हरी ओम टॉवर येथे नवीन इमारत, बरियातू येथील पल्स हॉस्पिटलवर छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानावरही छापे टाकल्याची माहिती आहे. (ED Raid on Pooja Singhal IAS)

 

मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक अमित अग्रवाल यांच्या घरावरही छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. अमित हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. या संपूर्ण प्रकरणाबाबत अंमलबजावणी संचालनालयाकडून अधिकृत दुजोरा मिळण्याची प्रतीक्षा आहे.

 

 

मुझफ्फरपूर येथील घरावर छापेमारी

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सिंघल यांच्या मुझफ्फरपूरमधील मिठनपुरा ठिकाणावर सुद्धा ईडीचे छापे सुरू आहेत. हे घर पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांचे आहे. ते बिहार सरकारमध्ये पदाधिकारी होते. त्यांचा मुलगा अभिषेक झा यांच्याशी पूजा सिंघल यांनी दुसरे लग्न केले आहे.

 

पूजा सिंघल यांच्या पतीच्या निवासस्थानावरही छापा

आयएएस पूजा सिंघल यांचे पती अभिषेक यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत. आएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पूजा सिंघल यांनी अभिषेक यांच्यासोबत लग्न केले. ईडीचे अधिकारी रांचीमधील रातू रोडवरील अभिषेकच्या ठिकाणांची चौकशी करत आहेत. ईडीने छापे टाकून त्याच्या घरातून कागदपत्रे जप्त केली आहेत. यानंतर अधिकारी कागदपत्रे घेऊन कार्यालयात निघाले.

डॉ. निशिकांत दुबे यांनीही दिली माहिती

गोड्डाचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनीही शुक्रवारी पहाटे ट्विट करून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये आरोप केला आहे की, पूजा सिंघल यांनी मुख्यमंत्री, त्यांचे भाऊ, गुंड, इत्यादींना कवडीमोल भावाने खाणींचे वाटप केले. अखेर, त्यांच्यावर ईडीने छापे टाकले, जे देशातील 20 ठिकाणी सुरू आहेत. रांची, दिल्ली, राजस्थान, मुंबई येथे ही छापेमारी सुरू आहे.

 

ईडीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती माहिती

मनरेगा घोटाळ्याच्या एका प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने संपूर्ण प्रकरणाच्या माहितीशी संबंधित प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगितले होते की, झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील मनरेगामध्ये 18.06
कोटी रुपयांचा घोटाळा झाला तेव्हा तेथे उपायुक्त पूजा सिंघल होत्या.

 

या प्रकरणी कनिष्ठ अभियंता राम विनोद प्रसाद सिन्हा यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले, त्यांनी ईडीला दिलेल्या जबानीत कमिशनची
रक्कम उपायुक्त कार्यालयापर्यंत पोहोचत असल्याचे मान्य केले होते.
ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला चतरा आणि पलामू या दोन्ही प्रकरणांच्या तपासाबाबत माहिती दिली होती.

 

पूजा सिंघल यांची ऑगस्ट 2007 ते जून 2008 या कालावधीत चतरा जिल्ह्यात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मनरेगा अंतर्गत त्यांनी दोन एनजीओंना 6 कोटी रुपये आगाऊ दिल्याचा आरोप आहे.
या दोन स्वयंसेवी संस्थांमध्ये वेलफेअर पॉइंट आणि प्रेरणा निकेतन यांचा समावेश आहे.
ही रक्कम मुसळीच्या लागवडीसाठी देण्यात आली, पण तेथे असे कोणतेही काम झालेले नसल्याने, त्याचा तपास सुरू आहे.

 

याशिवाय पलामू जिल्ह्यात उपायुक्त असताना पूजा सिंघल यांनी सुमारे 83 एकर वनजमीन एका खासगी कंपनीला खाणकामासाठी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
कथौटिया कोळसा खाणीशी संबंधित हा विषय आहे. या प्रकरणाचाही तपास सुरू असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले होते.

Web Title :- ED Raid on Pooja Singhal IAS | ed raids on ias pooja singhal places in ranchi including 18 locations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

AR Rahman Daughter Marriage | ए. आर. रहमानची मुलगी अडकली विवाहबंधनात; वाचा कोण आहे त्याचा जावई?

Ramdas Athawale on Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे… सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका वांदा’ – रामदास आठवले

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या मुख्य शहरातील दर