AR Rahman Daughter Marriage | ए. आर. रहमानची मुलगी अडकली विवाहबंधनात; वाचा कोण आहे त्याचा जावई?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – AR Rahman Daughter Marriage | संगीत कला विश्वातील एक दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान (AR Rahman) यांची मुलगी खतिजा रहमान ही विवाहबंधनात (AR Rahman Daughter Marriage) अडकली आहे. ए. आर. रहमान यांनी याबाबत माहिती दिली असून एक फोटोही शेअर केला आहे.

 

https://www.instagram.com/accounts/login/?next=/p/CdLuEkvvJIo/

 

रहमान यांनी फोटो पोस्ट करत, देवाचा तुमच्या दोघांवर आशीर्वाद असो, शुभेच्छांसाठी तुमच्या सर्वांचे आभार, असं कॅप्शन दिलं आहे. रहमान यांच्या जावयाचं नाव, रियासदीन शेख मोहम्मद असून तो साउंड इंजिनिअर आहे. रियासदीन ए. आर. रहमान आणि अमित त्रिवेदी (Amit Trivedi) यांच्यासाठीही काम करतो. (AR Rahman Daughter Marriage)

 

खतिजाची ओळख केवळ ए. आर. रहमानची मुलगी एवढ्यापुरती मर्यादित नाही. खतिजा तिच्या वडिलांप्रमाणेच एक गायिका आणि समाजसेविका आहे. खतिजाने क्रिती सेननच्या अलीकडील रिलीज झालेल्या ‘मिमी’ (Mimi) चित्रपटातील ‘रॉक अ बॉय बेबी’ गाण्याला तिचा आवाज दिला होता. या चित्रपटाचे संगीतकार ए. आर. रहमान होते.

 

दरम्यान, संगीत विश्वातील इतर दिग्गजांनीही खतिजाला आणि रियासदीनला शुभेच्छा दिल्या आहेत. रहमानच्या चाहत्यांनीही दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Web Title :- AR Rahman Daughter Marriage | a r rahmans daughter khatija got married check out her nikah pictures


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Pune Bypass Highway Accident | मुंबई-पुणे बंगळुरू मार्गावर दुचाकी ट्रकवर आदळून एकाचा मृत्यु; दुचाकीवरील दोघे जखमी

Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘मराठी माणसांच्याही मर्सिडीज असायला पाहिजेत, पण कष्टाच्या; चोरीच्या नको’ – संजय राऊत

Pune Crime | धक्कादायक! व्हिस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार

Yoga For Menstrual Cramps | ‘ही’ 3 योगासन तुम्हाला देतील मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम; जाणून घ्या

Yoga For Menstrual Cramps | ‘ही’ 3 योगासन तुम्हाला देतील मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम; जाणून घ्या

Digital Banking In India | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! देशाच्या 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँका सुरू होणार

Watermelon For Diabetes | डायबिटीजचे रूग्ण कलिंगड खाऊ शकतात का? जाणून घ्या सत्य