ICICI बँकेच्या माजी MD चंदा कोचर यांच्याविरोधात ‘ED’ ची मोठी कारवाई, 78 कोटींची ‘संपत्ती’ जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – व्हिडीओकॉन कर्जप्रकरणात दोषी ठरलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने कोचर यांच्या मुंबईतील घर आणि त्यांच्या पतीच्या कंपनीच्या काही संपत्तीसह 78 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक असताना बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते. बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 3250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याबदल्यात धूत यांनी कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत 64 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे.

चंदा कोचर यांच्यावरील आरोप
व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपने कर्ज दिले होते. यामध्ये आयसीआयसीआय बँकेचा 10 टक्के वाटा होता. धूत यांनी बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाच्या मोबदल्यात कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावाची कंपनी सुरु केली. यामध्ये दीपक यांची 50 टक्के भागीदारी होती. हा सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.

वेणुगोपाल धूत आणि दीपक कोचर यांच्या दोन नातेवाईकांनी एक कंपनी सुरु केली होती. या कंपनीना आयसीआयसीआय बँकेने 64 कोटी रुपये कर्ज दिले होते. मात्र, काही दिवसात या कंपनीची मालकी दीपक कोचर यांना 9 लाखात मिळाली होती. कोचर यांचा हा काळाबाजार उघड झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/