कानाच्या वेदनेने त्रस्त लोकांनी करून पहावेत ‘हे’ 8 सोपे उपाय, ताबडतोब मिळेल आराम

पोलिसनामा ऑनलाइन – जर तुम्हाला कानाची काही समस्या असेल, वेदना होत असतील आणि सहन करणे अवघड होत असेल तर ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्याने वेदनांपासून ताबडतोब आराम मिळतो. यासाठी ऑलिव्ह ऑईल किंचित कोमट करून घ्या. याचे दोन तीन थेंब कानात टाका किंवा कापसाच्या मदतीने तेल कानात टाका.

जर कानाची वेदना संसर्गामुळे होत असेल लसूणचा वापर करा. लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या तिळाच्या तेलात गरम करा. ते थंड होऊ द्या, नंतर एक किंवा दोन थेंब कानात टाका. असे केल्याने आराम मिळतो.

कांद्याचा अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुण कानदुखीत आराम देण्यास मदत करतात. कांद्याचा रस हलका गरम करा. हा रस थंड झाल्यानंतर कानात टाका.

कानात उष्णता जाणवल्यानंतर आराम जाणवतो, यासाठी हॉट वॉटर बॉटल कपड्यात गुंळाळून कानाच्या आजू-बाजूला शेक द्या.

लिंबू आणि तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण आढळतात. याची काही पाने घेऊन हाताने चुरघळून त्याचा रस काढून त्याचे दोन थेंब कानात टाका.

कानाच्या बाहेरील भागाच्या जवळपास आल्याचा रस गरम करून लावा. हा रस कानात टाकू नये.

वेदनांपासून आराम मिळण्यासाठी मसाज सुद्धा करू शकता. यासाठी चावण्याच्या मासपेशींपासून सुरू करून हळुहळु जोद देत कानांच्या मागे, मान मागच्या बाजूल घेत समोर मालिश करा.

वेदना शांत करण्यासाठी थंड किंवा गरम शेक घेऊ शकता. गरम आणि थंड पॅड 10-10 मिनिटांसाठी कानावर ठेवा. या पद्धतीचा वापर वृद्ध आणि मुलांसाठी केला जातो. मुलांच्या कानावर थेट बर्फ लावू नये. हिटिंग पॅडचे पाणी जास्त गरम ठेवू नका.