नाशिकमध्ये चक्कर येऊन पडल्याने 8 ते 9 जणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच नाशिक शहरात एक वेगळा प्रकार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिसापासून चक्कर येऊन पडल्याने ८ ते ९ जणांचा मृत्यू झाला आहे. चक्कर येऊन मृत्यू होणं असा प्रकार नेमका काय आहे याचे कारण अद्याप समजले नाही. तर या व्यक्तींना कोणत्या डॉक्टरांनी तपासले यासंदर्भात तपशील अष्पष्ट असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

लोक चक्कर येऊन मृत्यू झालेल्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. यावरूनच शहरात खळबळ उडाली आहे. या चक्कर येण्याच्या प्रकरणामुळे वैद्यकीय विभागही चक्रावून गेले आहे. तर अशा पद्धतीचा प्रकार कोरोनाने होत आहे का आणखी काय आहे. याबाबत वैद्यकीय क्षेत्रात मतभेद निर्माण झालॆय. परंतु, चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे आणि समानकाही लक्षणे असल्यास त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधला जावा असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी दिले आहे. तसेच चक्कर आल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण महापालिकेने नोंदवले गेलेले नाही. कोणा व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास संबंधित डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र काहीतरी दिले असेल त्यातून त्याचा खुलासा होऊ शकतो असे या प्रकाराबाबत महापालिकेच्या कोविड सेलचे प्रमुख डॉ. पलोड यांनी म्हटले आहे.

या दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झाले असल्याचा नकार करत चक्कर येणे आणि मळमळणे हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याच्या तपशिलात जाऊन बघावे लागणार आहे. संबंधित मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांकडे असलेल्या मृत्यूच्या प्रमाणपत्रात ते स्पष्ट होऊ शकते असे त्यांनी म्हटले. परंतु, तरीही चक्कर येणे किंवा तत्सम कोणत्याही आजाराबाबत गाफिल राहू नये असे आवाहन देखील महापालिकेच्या कोविड सेलचे प्रमुख डॉ. पलोड यांनी सांगितले आहे.