‘हे’ 5 दिग्गज बॉलिवूड स्टार झाले एकतर्फी प्रेमात ‘बरबाद’, शेवट असा झाला, ना लग्न केलं ना प्रेम !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत जे प्रेमात पडले तर त्यांचा पार्टनर गंभीर नव्हता. तर अनेकदा ते एकतर्फी प्रेमाचेही शिकार झाले आहेत. अशाच काही स्टार्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) जिया खान –  जिया खान सुरज पांचोलीवर खूप प्रेम करत होती. परंतु तो तितकासा गंभीर नव्हता हेच कारण होतं की, जियानं एक दिवस आत्महत्या केली. सूरजमुळे तिनं आत्महत्या केल्याचं जियाच्या घरच्यांचं म्हणणं होतं. यानंतर सूरजविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईदेखील करण्यात आली होती.

2) सुलक्षणा पंडित –  एक काळ असा होता की, अनेक हिट सिनेमात काम करणारी सुलक्षणा पंडित ही अभिनेते संजीव कुमार साठी वेडी होती. तिनं संजीवला प्रपोज करत लग्नाचा प्रस्तावही दिला होता. मात्र ते हेमाच्या प्रेमात असल्यानं त्यांनी तो नाकारला. 1999 च्या मुलाखतीत सुलक्षणानं खुलासा केला होता की, संजीवच्या मनात हेमा मालिनी होती. संजीवच्या निधनानंतर सुलक्षणानं सिनेमे सोडले आणि बाह्य जगाशी नातंही तोडलं होतं.

3) गुरू दत्त –  प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक गुरू दत्त यांनी वहिदा रहमान हिला लाँच केलं होत. तिच्या प्रेमात ते पागल झाले होते. गुरू दत्तच्या पत्नीला जेव्हा वहिदाबद्दल माहिती पडलं तेव्हा वहिदा यांनी गुरूसोबत काम न करण्याचं ठरवलं. यानंतर गुरू मद्यापान करू लागले. एक दिवस त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. गुरू दत्तही एकतर्फी प्रेमाचे शिकार झाले.

4) संजीव कुमार –  संजीवर कुमार हेमा मालिनीच्या प्रेमात असताना हेमा धर्मेंद्रच्या प्रेमात होत्या. त्यांनी संजीवच्या प्रेमाचा प्रस्ताव फेटाळला होता. यानंतर ते दारूच्या आहारी गेले. त्यांनी लग्नही केलं नाही. 47 व्या वर्षीच हार्ट अटॅकनं त्यांचं निधन झालं.

5) करण जोहर –  फेमस फिल्ममेकर करण जोहर ट्विंकल खन्नाच्या प्रेमात होता. एक रिपोर्टनुसार, करणनं ट्विंकलसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला असता तिनं तो फेटाळून लावला होता.