Ekda Kay Zala | ‘एकदा काय झालं!!’चा टीझर प्रदर्शित, गाणीही रिलीज…

पोलीसनामा ऑनलाइन – Ekda Kay Zala | ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरची जोरदार चर्चा सुरू असतानाच सर्वांना प्रतिक्षा होती की या, चित्रपटाचे टिझर केव्हा प्रदर्शित होणार, पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, कारण आज (ता. १२) या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले आहे. यासोबतच ‘डबल धमाका’ म्हणजे या चित्रपटातील गाणीही आज प्रदर्शित करण्यात आली. प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्या हस्ते टीझर लॉन्च करण्यात आला. तर सुनिधी चौहान, शुभंकर कुलकर्णी यांनी चित्रपटातील गाणी सादर केली. (Ekda Kay Zala)

 

अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका असून, टीझरमध्ये एक वेगळ्या प्रकारची शाळा दिसतीये. अनेक लहान मुले दिसत आहेत. गोष्टी सांगणाऱ्या माणसावर आधारित ही चित्रपटाची कथा आहे. तसेच बाबा आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी आणि नात्यांवर नवा प्रकाश टाकणारी अशी या चित्रपटाची कथा आहे. मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. (Ekda Kay Zala)

 

 

डॉ. सलील कुलकर्णी यांच्या चित्रपटातील गाणी म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. याही चित्रपटातील गाण्यांची चर्चा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच होत आहे. या चित्रपटातील गाण्यांची विशेष बाब म्हणजे या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुनिधी चौहान या दिग्गजांनी गाणी म्हणली आहेत. तसेच शुभंकर कुलकर्णी याचाही आवाज या चित्रपटातील गाण्याला लाभला आहे. या चित्रपटात ‘भिमरूपी’, ‘रे क्षणा’, ‘राम आणि श्याम’, ‘बाळाला झोप का गं येत नाही’ ही अंगाई अशी चार गाणी आहेत. यापैकी ‘रे क्षणा’ या गाण्याला शंकर महादेवन यांनी, तर ‘बाळाला झोप का गं येत नाही’ या गाण्याला सुनिधी चौहान यांनी चार चाँद लावले आहेत. ‘राम आणि श्याम’ हे गाणे शुभंकर कुलकर्णीने गायले आहे, तर ‘भिमरूपी’ या गाण्याला अनेक बाल गायकांचा आवाज लाभला आहे. या चित्रपटातील गीते संदीप खरे, समीर सामंत आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहेत.

या कार्यक्रम सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकारांनी व निमंत्रितांनी उपस्थिती लावली.
कौशल इनामदार, चिन्मयी सुमीत, मृण्मयी देशपांडे, फुलवा खामकर, ऋचा इनामदार उपस्थित होते.

 

डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे.
विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन या चित्रपटाला लाभले आहे,
तर त्यांचा मुलगा आणि संगीतकार सिद्धार्थ महादेवन, शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

 

‘एकदा काय झालं!!’ हा चित्रपट पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत करत आहेत.
तर या चित्रपटाची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दाते, अनुप निमकर, नितीन प्रकाश वैद्य आणि
डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सुमेंदु कुबेर आणि
सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

 

Web Title :- Ekda Kaay Zala | Teaser of ekda kaay zala !’ released, songs also released…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा