Pune PMC News | पुणे महापालिकेलाही ‘महागाई’ची झळ ! महावितरणची वीजदरात तर जलसंपदाची पाणीपट्टी दरात वाढ; महापालिकेला 130 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | सर्वत्रच महागाईचा आगडोंब उसळला असताना जलसंपदा विभाग आणि महावितरणने (Mahavitaran) महापालिकेलाही (Pune Municipal Corporation) महागाईचा झटका दिला आहे. जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केल्याने तसेच वीजदरात ५ टक्के वाढ झाल्याने महापालिकेचा सुमारे १३० कोटी रुपयांनी खर्च वाढणार आहे. यामुळे अगोदरच राज्यात सर्वाधीक मिळकत कर आकारणीत प्रसिद्ध असलेली पुणे महापालिका दिवसेंदिवस वाढत असलेला खर्चाचा भार पुणेकरांवर टाकण्याची चिन्हे दिसत आहेत. (Pune PMC News)

 

अगोदरच पेट्रोल, डिझेल, गॅस आणि सीएनजीच्या ऐतिहासिक दरवाढीने वाढलेल्या महागाईमुळे नागरिक हवालदील झाले आहेत. यामध्ये भर म्हणून की काय नुकतेच राज्य वीज नियामक मंडळाने वीज दरात सरासरी पाच टक्के वाढ केली आहे. तर पाठोपाठ जलसंपदा विभागानेही महापालिकेला पुरविण्यात येणार्‍या पाण्याच्या दराचे नवीन सूत्र ठरविले असून महापालिकेच्या पाणीपट्टीमध्ये अव्वाच्यासव्वा वाढ केली आहे. (Pune PMC News)

 

महापालिकेची पाणी पुरवठा यंत्रणा (PMC Water Supply), एस.टी.पी. प्लॅन्ट, इमारती आणि रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेसाठी दरवर्षी फक्त वीजबीला पोटी सुमारे २०० कोटी रुपये खर्च करत आहे. वीज दरात ५ टक्के वाढ झाल्याने १० कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे. वीज दरवाढ होत नाही तोवर जलसंपदा विभागाने पाणीपट्टी वाढीचे पत्र महापालिकेला धाडले आहे. पिण्यासाठी धरणातून पाईपलाईनद्वारे घेण्यात येणार्‍या प्रति हजार लिटर पाण्याचा दर ३० पैशांवरून ५५ पैसे करण्यात आला आहे. कालव्यातून उचलल्यास हा दर १ रुपये दहा पैसे राहील. प्रक्रिया उद्योगांसाठी पाईपलाईनद्वारे ४.८० रुपयांऐवजी ११ रुपये, कच्चा माल उद्योगांना १२० रुपयांऐवजी १६५ रुपये तर हेच पाणी कालव्यातून उचलल्यास अनुक्रमे २२ रुपये आणि ३३० रुपये करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठविला आहे.

महापालिकेचा पाण्याचा कोटा ११.५० टीएमसी आहे. परंतू प्रत्यक्षात महापालिका २० टी.एम.सी. पाणी धरणातून घेते.
कोट्यापेक्षा अधिकच्या अर्थात ८.५० टी.एम.सी. पाण्याचा दरही दुप्पट अर्थात १ रुपया १० पैसे करण्याचे प्रस्तावीत केले आहे.
हा प्रस्ताव आहे तसा मंजुर केल्यास महापालिका आजमितीला जलसंपदा विभागाला पाणी पुरवठ्यापोटी भरत असलेले
८० कोटी रुपयांचे बील साधारणपणे २०० कोटी रुपयांवर पोहोचणार आहे, अशी माहिती
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी दिली.
या प्रस्तावाला महापालिकेचा विरोध असून लवकरच जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune PMC News | Inflation hits Pune Municipal Corporation too! Increase in
electricity tariff of MSEDCL and water tariff of water resources; 130 crore additional burden on PMC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात हाय टेन्शन वायरखाली अडकून भाजीविक्रेत्या तरुणाचा मृत्यू

Salman Khan | सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती 4 लाखांची रायफल – गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं

Pune News | शेतातील खड्ड्याने घेतला तीन चिमुकल्या भावंडांचा जीव