NCP MP Supriya Sule | ‘तर 2024 ला राष्ट्रवादी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल’ – सुप्रिया सुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  NCP MP Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकत्र दौरा काढला तर राज्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे 2024 मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्या आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या. याच बैठकीत शरद पवार यांनी भाजपा संसदीय लोकशाहीवर हल्ला करत असल्याची टीका केली. (NCP MP Supriya Sule)

 

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी पवारसाहेबांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही 105 असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले 50 आहेत हे लक्षात ठेवा असे सूचक वक्तव्य सुळे यांनी केले.

 

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. काय करायचे असे जेव्हा साहेबांना विचारते,
तेव्हा ते म्हणाले, पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून
शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पैसे देऊन जाणारे आहेत,
त्यांच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे.
मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावी असे देशातील लोकांना वाटत आहे.

तपास यंत्रणांना लक्ष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवाबभाई यांनी दिल्लीला अक्षरशः हलवून सोडले होते.
मोठा फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई झाली हा अन्याय झाला आहे.

 

Web Title :- NCP MP Supriya Sule | ncp chief sharad pawar daughter
mp supriya sule says ncp can be number 1 party in 2024 maharashtra elections if ajit pawar jayant patil work together

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा