×
Homeताज्या बातम्याEknath Khadse | खडसे-अमित शहा भेटीवर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण, ही भेट घेण्यापूर्वी...

Eknath Khadse | खडसे-अमित शहा भेटीवर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण, ही भेट घेण्यापूर्वी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्याचे वृत्त माध्यमांमधून दिले जात आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. अमित शाह आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भेटीची चर्चा आहे, ती भेट झालेली नाही. दोघांमध्ये फोनवर चर्चा झालेली आहे. ही भेट घेण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी संपूर्ण विषय राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना सांगितला होता, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी देत या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे अमित शाह यांना भेटणार होते. खडसे एकटे जाणार नव्हते. पवार साहेबांसोबत ते जाणार होते. अजून ती भेट झालेली नाही. त्यामुळे खडसे भाजपमध्ये (BJP) जाणार, हे वृत्त दिले जात आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. खडसे यांनी देखील याबाबत खुलासा केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्याचमुळे हा विषय चुकीचा आहे, अशी काहीही परिस्थिती नाही, असं तपासे यांनी स्पष्ट केलं.

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे, या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वागत करते. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची 40 वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढे नेत आहेत. अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या दसरा मेळाव्यातील (Dasara Melava 2022) भाषण ऐकत असतात. त्यामुळे त्यांना मिळालेली परवानगी ही योग्यच असल्याचे तपासे यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांनी अमित शहांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती खरी असल्याचे सांगताना अमित शाह आणि
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबरोबर आपले मागील अनेक वर्षापासून चांगले वैयक्तीक संबंध
आसल्याचे खडसे यांनी सांगितले. अमित शहांना एकदा भेटलो नाही याआधी पण भेटलो आहे.
देवेंद्रजींनाही (Devendra Fadnavis) भेटलो आहे आणि या पुढेही भेटणार आहे.
शहांना भेटू नये असा नियम आहे. हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे संबंध आहेत, असे खडसे यांनी सांगितलं.

Web Title :-  Eknath Khadse | NCP leader eknath khadse to meet amit shah ncp clarification

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pre-Diabetes Diet | प्री-डायबिटीज असेल तर आजच ‘या’ 8 फूड्सपासून राहा दूर

IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

Moto Vault | मोटो व्हॉल्टच्या  पहिल्या शोरूमचे पुणे येथे उद्घाटन

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News