Eknath Shinde Government | शिवसेनेला धक्का दिला ! अब की बार, शिंदे सरकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Government | महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात 99 मते पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे जाहीर करून तो मंजूर केला. (Eknath Shinde Government)

 

भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी अनुमोदन दिले. यानंतर सभागृहात बहुमत चाचणीत घेण्यात आली. या चाचणीत भाजप-शिंदे गटाला 164 मते मिळाली. तर महाविकास आघाडीला 99 मते मिळाली. या मतदानाच्या वेळी, सपा आणि MIM चे आमदार तटस्थ राहिले. यानंतर विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी जाहीर केले. (Eknath Shinde Government)

 

दरम्यान, काल शिवसेनेने (Shivsena) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन व्हिप जारी केले होते. विधानसभेच्या कामकाजाच्या पटलावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोघांच्याही व्हिपची नोंद होती. काल रात्री उशिरा नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली नियुक्ती योग्य असल्याचे मान्य केले आहे. तसेच शिवसेना विधीमंडळाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू आणि गटनेते अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) आणि गटनेते अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द केल्याने शिवसेना न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहे.
याचे संकेत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिले.

 

राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देताना म्हटले की, आम्ही नक्कीच कायदेशीर लढाई लढू.
कायदेशीर लढाई लढावीच लागेल. 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात त्या संदर्भात एक महत्वाची सुनावणी आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका प्रलंबित असताना, अशाप्रकारे विधीमंडळात निवडणुका घेणे बेकायदेशीर आहे.
जोपर्यंत 11 तारखेचा निकाल लागत नव्हता, तोपर्यंत अशा प्रकारची निवडणूक घेणे हे घटनाबाह्य आहे.
ते पात्र की अपात्र हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल, त्यानंतर तुम्ही हा निर्णय घेणे गरजेचे होते.

 

Web Title :- Eknath Shinde Government | bjp eknath shinde shivsena won floor test maharashtra vidhan sabha government devendra fadnavis ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yoga Asanas For Energy And Strength | दिवसाची सुरुवात ‘या’ योगासनांच्या सरावाने करा, राहील ताकद आणि चैतन्य

 

Pune Crime | हडपसर परिसरातील पादचार्‍यांना लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुंडाची टोळी जेरबंद

 

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या