Eknath Shinde Group | शिवसेनेचे 15 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) याच्या बंडखोरीमुळे शिवसेनाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. राज्यातील महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi Government) सत्ता उलथवून टाकण्यात शिंदे गट यशस्वी झाला आहे. आता शिंदे गटाने (Eknath Shinde Group) आपला मोर्चा शिवसेनेच्या खासदारांकडे (Shivsena MPs) वळवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील काही खासदार सुद्धा बंडखोरीच्या तयारीत असून शिंदे यांनी या खासदारांची नुकतीच वर्षा बंगल्यावर बैठक घेतली आहे. शिवसेनेच्या एकुण 18 लोकसभा खासदारांपैकी 15 खासदार या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. यामुळे आगामी काळात शिवसेनेसमोरील संकट आणखी वाढणार असल्याचे चिन्ह आहे.

 

आमदारांपाठोपाठ अनेक नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता दोन तृतीयांश खासदार सुद्धा शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनेची पुढील वाट बिकट असणार आहे. संसदीय कार्यकारणीचा मोठा गट जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला तर संसदीय राजकारणातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिल. (Eknath Shinde Group)

लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांची संख्या कमी झाली तर शिवसेनेची संसदेतील ताकद कमी होईल.
लोकसभेतील त्यांचे गटनेतेपदही जाईल. एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढेल. आम्हीच खरी शिवसेना, असा दावा शिंदे गट करेल.
यामुळे आगामी निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणे बदलतील.

 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी हिंदूत्वाचे कारण सांगत भाजपाशी संगनमत करून शिवसेना पक्षाला प्रचंड मोठे भगदाड पाडले.
यानंतर मोठी राजकीय उलथा – पालथ झाली.
आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी खासदारांच्या बैठकीत भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला.
मात्र, तरीही खासदार बंडखोरी करत असल्याने हिंदूत्वाचे सांगण्यात येत असलेले कारण खरे नसल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title :- Eknath Shinde Group | big blow to uddhav thackeray may be 15 shiv sena mps in chief minister eknath shindes group

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा