Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | CM एकनाथ शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतला; जाणून घ्या काय घडलं?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे अस्ताव्यस्त झालेल्या शिवसेनेसाठी (Shivsena) चांगले संकेत आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यभरात बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) मतदार संघात जाऊन पदाधिकारी, शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद यात्रा (Shivasanvad Yatra) सुरू केली आहे. या यात्रेचा चांगला परिणाम शिवसेनेवर दिसून येत आहे. (Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray)

 

कारण शिंदे गटात (Eknath Shinde Group) गेलेला पुण्यातील शिवसेनेचा एक मोठा पदाधिकारी पुन्हा मुळ शिवसेनेत दाखल झाला आहे. शिंदे गटातून मूळ शिवसेनेत परत येणारे राजू विटकर (Raju Witkar) हे पहिले शिवसैनिक ठरले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पत्राद्वारे माफी मागत त्यांनी पुन्हा पक्षात जोमाने काम करू असे वचन दिले आहे.

 

बंडखोर आमदार, खासदार यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत (Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray). त्यात पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील (Shivajinagar Constituency) पदाधिकारी राजू विटकर हे देखील शिंदे गटात गेले होते. परंतु ते आता स्वगृही परतले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेत भावूक झालेले, बंडखोरीमुळे व्यथीथ झालेले जुने-जाणते शिवसैनिक रडताना पाहून विटकर यांच्यातील शिवसैनिक जागा झाला. शिवाय त्यांच्या घरातील लोकांनाही शिंदे गटात जाण्याचा निर्णय पटला नसल्याचे सांगितल्याने राजू विटकर यांनी आपला निर्णय बदलला आहे.

शिंदे गटात कसा गेलो हे सांगताना राजू विटकर म्हणाले की, मी 32-33 वर्ष शिवसेनेत काम करत होतो. मला 2-3 वेळा तिकीट दिले होते. रोजच्या बातम्या बघून बघून पक्षप्रवेश चालले होते. तेव्हा मलाही एकनाथ शिंदे यांना भेटावे आणि काही गोष्टी बोलाव्या असे वाटले. मी मुंबईत गेलो, मेळाव्यात सहभागी झालो. मुख्यमंत्री शिंदे यांनीही माझे नाव घेतले. मला आनंद झाला.

 

पुन्हा शिवसेनेत का आलो हे सांगताना विटकर म्हणाले, त्यानंतर मुंबईतून मी पुण्यासाठी निघालो, मध्यरात्री दीड पावणे दोन वाजता घरी आलो. घरच्यांनी विचारले तेव्हा मी सगळे सांगितले. परंतु माझ्या घरच्यांना ते पटले नाही. पक्षासोबत मी असे नको करायला हवे होते कुटुंबिय म्हणाले. (Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray)

 

त्यानंतर मी टीव्ही लावली तर त्यावर आदित्य ठाकरे यांची रॅली पाहिली, काही वयस्कर शिवसैनिक रडत होते, दिव्यांग शिवसैनिकाने पत्र लिहिले होते. हे सगळे पाहून मी भावनिक झालो. त्यातून माझे विचार बदलले. आपण फार मोठी चूक करतोय हे लक्षात आले.

 

विटकर पुढे म्हणाले, अशा संकटाच्या काळात पक्षासोबत राहणे गरजेचे आहे. शिवसेना या चार शब्दाने मला ओळख दिली.
त्यामुळे पक्षाचे नाव जपणे महत्त्वाचे आहे असे मला वाटले. त्यानंतर शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) यांची भेट घेतली.
गोर्‍हे यांनी त्यांच्या वाहनातून भगवे उपरणे काढून पुन्हा पक्षात प्रवेश दिला.
दरम्यान, राजू विटकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात स्वत:ची चूक
मान्य करत मला पुन्हा पक्षात घ्यावे अशी विनंती केली आहे.

पक्षासाठी भावनिक होत विटकर म्हणाले, मी दोनदा महापालिकेच्या निवडणुकीत उभा राहिलो.
मी इतका मोठा कार्यकर्ता नाही. मी देवाला साकडे घालतो. काही तरी चमत्कार घडव, एकच शिवसेना राहावी.
पक्षात फूट पडणार नाही. एकनाथ शिंदेंनी पुन्हा शिवसेनेसोबत एकत्र यावे, एकत्र काम करूया. (Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray)

 

विटकर यांनी म्हटले आहे की, शिंदे यांनी शिवसैनिकांचा विचार करावा, पक्षात फूट पडू नये.
एकनाथ शिंदे यांना फोन करून पुन्हा येण्याचे आवाहन करा. कदाचित तुमच्या फोनची ते वाट पाहत असतील.
ज्याला आम्ही मारत आहोत, जो आमच्यावर हल्ला करत आहे, दोन्ही शिवसैनिक आहोत.
शिवसैनिकाचे मरण यात होत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे.

 

Web Title :- Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | shivsainik raju vitkar who had gone to the cm eknath shinde group returned to shivsena uddhav thackeray within only 4 hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…