Eknath Shinde | महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही, पण सरकारचा रिमोट देवेंद्र फडणवीसांच्या हाती ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री (CM) म्हणून शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. तसेच या सरकारमध्ये आपण नसणार, मात्र या सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे काम करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या मास्टर स्ट्रोकने उद्धव ठाकरे यांना चितपट केले आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर आनंद होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यासाठी आपले पद सोडण्याची तयारीही ठाकरे यांनी दर्शवली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या नावाची घोषणा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारमध्ये भाजप आणि अपक्षांचा समावेश असणार आहे.
मात्र, देवेंद्र फडणवीस हे या मंत्रिमंडळात सहभागी असणार नाहीत.
त्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहेत.

 

मंत्रिमंडळात भाजपचा वरचष्मा ?

सत्तावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झाले नाही. एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर काही दिवसांनी इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या सरकारमध्ये सर्वाधिक आमदार भाजप आणि मित्र पक्षाचे आहेत.
त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांची संख्या जास्त असणार आहे.

 

सत्तेचा रिमोट फडणवीसांकडे ?

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्तेचा रिमोट असणार असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपचे मंत्रिमंडळावर असलेले वर्चस्व आणि फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव या आधारे राज्य सरकारचा रिमोट त्यांच्या हाती असणार आहे.
त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर, मुद्यांवर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | maharashtra government formation eknath shinde new chief minister shiv sena rebel government likely control by bjp leader devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा