Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंना नोटीस, चुकीचा इतिहास आणि अयोग्य धार्मिक माहिती जनमानसात पसरवली, ”शाळकरी मुलांनाही समजते ते….”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठ्यांचा इतिहास (History of the Marathas) आणि धार्मिक सणांबाबत समाजात चुकीची माहिती पसरवली, या कारणावरून सौरभ अशोकराव ठाकरे पाटील व तेजस राहुल बैस यांनी वकिलांद्वारे मुख्यमंत्र्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीत मुख्यमंत्र्यांनी सात दिवसाच्या आत लेखी माफीनामा द्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे म्हटले आहे.

ठाकरे आणि बैस या दोघांनी वकील असिम सरोदे (Asim Sarode), सुमित शिवांगी, रमेश तरू, संदीप लोखंडे यांच्याद्वारे ही कायदेशीर नोटीस मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे.(Eknath Shinde)

गुढीपाडव्याला दसरा संबोधले

ठाकरे व बैस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी इतिहासाची मोडतोड करणारी विधाने केली, तसेच गुढीपाडव्याला दसरा असे संबोधून जनतेमध्ये धार्मिक सणाबाबत अयोग्य माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी ही वक्तव्य कुठे आणि कधी केली याची सविस्तर माहिती ठाकरे-बैस यांनी नोटीसमध्ये दिली आहे.

महादजी, दत्ताजी शिंदे शिवरायांसोबत लढले

या नोटीसनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यात म्हटले होते की, महादजी शिंदे व दत्ताजी शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढले, शहीद झाले; पण, मागे हटले नाहीत. सत्य असे आहे की महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे यांचा कार्यकाळ व शिवाजी महाराजांचा कार्यकाळ यात बरेच अंतर आहे. हे विधान इतिहासाचा विपर्यास करणारे आहे.

बैस आणि ठाकरे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणे अपेक्षित असताना शाळेतील मुलांनाही जी माहिती आहे, त्याबद्दल चुकीचे बोलणे हे पदाच्या जबाबदारीचे भान नसणे आहे.

प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला म्हणून गुढीपाडवा

मुख्यमंत्री शिंदे यांनी आणखी एक चुकीचे वक्तव्य केले असून याबाबत बैस आणि ठाकरे यांनी म्हटले आहे की,
मुख्यमंत्री शिंदे यांनी गुढीपाडव्याच्या एका कार्यक्रमात ९ एप्रिल २०२४ रोजी ठाणे शहरामध्ये म्हटले की,
प्रभू रामचंद्राने रावणावर मिळविलेल्या विजयानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो व संपूर्ण भारतभर तो साजरा होतो.
हे विधान देखील जनतेत चुकीची धार्मिक माहिती पसरविणारे आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या दोन्ही वक्तव्यावर ठाकरे व बैस यांनी आक्षेप घेतला असून मुख्यमंत्र्यांना याबाबत नोटीस पाठवली आहे.
या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, धर्मभावना दुखावणाऱ्या या विधानांबद्दल माफी मागावी, लेखी माफीनामा पत्र द्यावे.
नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत तसे केले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Yerawada Crime | पुणे : पाठलाग करुन अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, तरुणावर FIR

Baramati Lok Sabha Election 2024 | मोदींना ‘मनसे’ पाठिंबा, सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण