Pune Yerawada Crime | पुणे : पाठलाग करुन अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, तरुणावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerawada Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या घरापासून ती शिकत असलेल्या अकॅडमी पर्यंत वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी केली. तसेच तिच्या मोबाईलवर सतत संपर्क करुन विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवडा भागातील गांधीनगर (Gandhi Nagar Yerawada) परिसरातील एका अकॅडमी जवळ घडला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 37 वर्षीय आईने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरुन विजय चांदणे (वय-22 रा. गांधीनगर, येरवडा, पुणे) याच्यावर आयपीसी 354ड, 506 सह पोक्सो अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत घडला आहे.(Pune Yerawada Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी गांधीनगर परिसरातील एका अकॅडमीत शिकते.
पीडित मुलगी अकॅडमीत जात असताना आरोपीने तिचा घरापासून अकॅडमी पर्यंत वारंवार पाठलाग करुन प्रपोज केले.
तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु जर माझ्याशी लग्न केले नाहीतर स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी दिली.
तसेच मुलीच्या मोबाईलवर सतत फोन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत
नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

भररस्त्यात महिलेसोबत असभ्य वर्तन

बाणेर (Baner) : रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेला दुचाकीवरुन आलेल्या एका अनोळखी तरुणाने अश्लील स्पर्श
(Bad Touch) करुन विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि.11) बाणेर येथील ताम्हाणे चौक ग्राऊंड जवळ घडली.
याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Shinde On Pune Lok Sabha | पुण्यात भाऊ, तात्या कुणी नाही, मुरली अण्णाच रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Video)

Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘पवार टॅक्टिक्स’ची शरद पवारांकडून चिरफाड, पत्रकार परिषदेत हस्यकल्लोळ! (Video)

Lok Sabha Election In Maharashtra | शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एन्ट्रीने मूळ भाजप पदाधिकार्‍यांचा पक्षत्याग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या विश्‍वासार्हतेला छेद?

Shirur Lok Sabha Election 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का ! भाजप नेते अतुल देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Video)

Ajit Pawar On Pune Lok Sabha | रुसून बसू नका, तुमच्या माझ्या घरचं लग्न नाही, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना प्रेमळ दम (Video)

Eknath Shinde On Ajit Pawar | ते डोक्यावर बर्फ ठेवतात कारण त्यांना अनेक अनुभव…, अजितदादांही खळखळून हसले (Video)