Baramati Lok Sabha Election 2024 | मोदींना ‘मनसे’ पाठिंबा, सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati Lok Sabha Election 2024 | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत. अशातच राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे बारामती लोकसभेचे उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या प्रचार पत्रकांवर राज ठकरेंचा फोटो झळकताना दिसत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.(Baramati Lok Sabha Election 2024)

बारामती लोकसभा निवडणुकीकरीता महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde),
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे
यांचा देखील फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्या फोटोनंतर रामदास आठवले, रासपाचे महादेव जानकर यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या प्रचार पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. साधारण रोजच्या दौऱ्याचं प्रचार पत्रक जाहीर करण्यात येतं.
त्यामुळे सुनेत्रा परवारांचा दौरा कोणत्या गावात किती वाजता आहे. याची माहिती देणारं हे प्रचार पत्रक आहे.
या प्रचार पत्रकात आता राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Shinde On Pune Lok Sabha | पुण्यात भाऊ, तात्या कुणी नाही, मुरली अण्णाच रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Video)

Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘पवार टॅक्टिक्स’ची शरद पवारांकडून चिरफाड, पत्रकार परिषदेत हस्यकल्लोळ! (Video)

Lok Sabha Election In Maharashtra | शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एन्ट्रीने मूळ भाजप पदाधिकार्‍यांचा पक्षत्याग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या विश्‍वासार्हतेला छेद?

Shirur Lok Sabha Election 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का ! भाजप नेते अतुल देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Video)

Ajit Pawar On Pune Lok Sabha | रुसून बसू नका, तुमच्या माझ्या घरचं लग्न नाही, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना प्रेमळ दम (Video)

Eknath Shinde On Ajit Pawar | ते डोक्यावर बर्फ ठेवतात कारण त्यांना अनेक अनुभव…, अजितदादांही खळखळून हसले (Video)