सेनेच्या ‘त्या’ मंत्र्यांना पक्षात घेणासाठी काँग्रेसच्या हालचाली

मुंबई : पोलीसनामा  – काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेचे मंत्री अर्जन खोतकर यांना लोकसभाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षात अर्जुन खोतकर यांना घेणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी याबाबत महत्त्वाची बैठक घेणार असून यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांचे वैर सर्वश्रुत आहेत. स्वत:च्या बळावर जालन्यामधून आगामी येणारी निवडणूक दानवे यांच्या विरोधात लढून त्यांना आस्मान दाखवू असे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी वक्तव्य केले. पण शिवसेना व भाजप यांच्यात युती झाल्यामुळे काँग्रेसची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. युतीनंतर ही जागा भाजपला मिळणार आहे.

तरीही अर्जुन खोतकर जालन्यातून भाजपचे प्रदेश अध्यक्ष दानवे यांच्या विरोधात लढाणार आहेत व ते त्यांच्या भुमेकेवर ठाम आहेत. जालन्यामधून निवडणूक लढून वियजी होणारच. आणि दानवे यांच्या विरोधात शडू ठोकला आहे. जालना मतदार संघातून त्यांना पराभूत करण्याचा निर्धार त्यांनी उचला आहे.

या संधीचा फायदा बघून आमागी निवडणूकीच्या पार्श्वभमीवर काँग्रेस ने शिवसेनेचे मंत्री खोतकरांना पक्षात घेऊन जालन्यातून उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

You might also like