Election Commission | उद्धव ठाकरेंकडून ‘धनुष्यबाण’ काढून घेतल्यानंतर आता निवडणूक आयोग शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत, रष्ट्रवादीच्या ‘घड्याळ्या’बाबत मोठा निर्णय!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्षाचे नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून काढून घेतले. यानंतर आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या (National Party) दर्जाची समीक्षा निवडणूक आयोग (Election Commission) करणार आहे. यासाठी आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधीला मंगळवारी (दि.21) निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलावलं आहे.
राष्ट्रवादीचा आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा तेव्हाच दिला जातो जेव्हा त्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात. तसेच पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या दोन टक्के म्हणजेच तीन राज्यांमध्ये 11 जिंकाव्या लागतात.
राष्ट्रवादीकडून घड्याळ जाणार?
1968 च्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्या पक्षाला देशभरातील राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधीने केलेल्या अपीलावर निवडणूक आयोगाचे समाधान झाले नाही,
तर राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर (Clock Symbol) लढवता येणार नाही.
मात्र राष्ट्रवादीला महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष (Regional Party) म्हणून दर्जा असल्याने त्यांना महाराष्ट्रात
घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवता येऊ शकते.
Web Title : Election Commission | sharad pawar ncp national status to be reviewed by election commission
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा