Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit | अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit | आतापर्यंत फक्त व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Verification Certificate) आवश्यक होते, येणाऱ्या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ. किरण लहामटे, नाना पटोले (Nana Patole), संजय सावकारे (MLA Sanjay Savkare), धर्मराव बाबा आत्राम (Atram Dharmarao Baba) यांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासी उमेदवार यांनी जागा बळकावणे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

मंत्री गावित म्हणाले की, जात प्रमाणपत्र निर्गमित करणे (Caste Validity Certificate ) आणि त्याची पडताळणी करणे याबाबतची काही नियमावली आहे. त्यानुसारच राज्यातील मागास प्रवर्गातील जाती आणि जमातींना प्रमाणपत्र देण्यात येते तसेच या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येते. सामाईक प्रवेश परीक्षेमार्फत होणाऱ्या प्रवेशांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. येणाऱ्या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जात वैधता समित्यांची संख्या सातने वाढविण्यात आली असून आता राज्यात १५ जात वैधता समित्या आहेत.
येणाऱ्या काळात जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्रासंदर्भातील कार्यवाही सुटसुटीत होण्यासाठी
नवीन प्रणाली आणण्याचा अभ्यास करण्यात येईल.


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | स्वतःच्या स्टेटसला भावपूर्ण श्रध्दांजली ठेवत युवकाने रेल्वेखाली येऊन संपवले जीवन

Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय
दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – देवेंद्र फडणवीस

Nashik Crime News | नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास अंगावर वीज पडून वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Ajit Pawar On Water Pollution In Dams Of Pune District | पुणे जिल्ह्यातील धरणांतील
पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवा

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | सहा महिने झाले सरकारची नुसतीच घोषणा;
खेळाडूंचा गौरव ही नाही आणि पुरस्काराची रक्कम सुध्दा नाही